Join us

कोकणात करतात तशी पारंपरिक पद्धतीची भेंडीची भाजी करून पाहा, भेंडीची अशी चविष्ट भाजी खाल्ली नसेल कधी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2023 12:23 IST

Konkani Style Bhindi Recipe with Kokum and Coconut : डब्यासाठी खास करा कोकणी स्टाईल भेंडीची भाजी, रेसिपी होईल झटपट, डबाही होईल फस्त

अनेकांना भेंडीची भाजी खूप आवडते. भेंडीची भाजी (Okra) अनेक प्रकारे केली जाते. काहींना फक्त फोडणी दिलेली भेंडी आवडते तर, काही लोकं भरली भेंडी तयार करतात. लंच किंवा डिनरसाठी अनेक जण ग्रेव्ही भेंडी तयार करतात. पण आपण याहून हटके कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी तयार करू शकता.

रोजची त्याच-त्याच पद्धतीची भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर, कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी ट्राय करून पाहा. भेंडीची भाजी कशाला केली, असं म्हणत नाकं मुरडणारी मंडळी देखील कोकणी पद्धतीची चविष्ट भेंडीची भाजी चाटून-पुसून खातील. चला तर मग कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी कशी तयार करायची पाहूयात(Konkani Style Bhindi Recipe with Kokum and Coconut).

कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य

भेंडी

तेल

कडीपत्ता

लसूण

हिरवी मिरची

कांदा

वांग्याचं भरीत-भाजी नेहमीचीच, करून पाहा क्रिस्पी वांग्याची भजी, सोपी रेसिपी स्नॅक्ससाठी बेस्ट

मीठ

कोकम

ओल्या खोबऱ्याचं किस

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा, व त्यात बारीक चिरलेली भेंडी घालून भाजून घ्या. भेंडी भाजून घेतल्यामुळे भाजी बुळबुळीत तयार होणार नाही. भेंडी भाजताना आपण त्यात एक चमचा तेल घालू शकता. भेंडी भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. नंतर दुसरी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. नंतर त्यात ४ ते ५ कडीपत्त्याची पानं, ठेचलेला लसूण, ४ ते ५ बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून भाजून घ्या. नंतर त्यात २ बारीक चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतवून घ्या.

शिळी चपाती आणि उकडलेला बटाटा, ‘असा’ क्रिस्पी-कुरकुरीत चपाती रोल, चमचमीत रेसिपी

कांदा परतवून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. मीठ घातल्याने कांदा लवकर भाजला जाईल. नंतर त्यात भाजलेली भेंडी आणि ३ ते ४ भिजवलेले कोकम घालून छान मिक्स करा. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवा. ५ मिनिटांसाठी वाफेवर भाजी शिजवून घ्या. नंतर त्यात ओल्या खोबऱ्याचं किस घालून मिक्स करा. अशा प्रकारे कोकणी पद्धतीची भेंडीची भाजी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स