Join us
Daily Top 2Weekly Top 5

साधं पांढरं मीठ खावं की पिंक सॉल्ट? तज्ज्ञ सांगतात, व्हायरल माहितीच्या नादी लागू नका कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:30 IST

Consumption Of Pink Salt Beneficial Or Harmful For Health : मिठाच्या सेवनाबाबत काही मुद्दे उपस्थित करून लोकांना रोजच्या आयुष्यात आयोडीनयुक्त मीठाऐवजी आयोडीनयुक्त मिठाचा आहारात समावेश करण्याच्या धोक्यांबाबत सांगितले आहे.

मिठाशिवाय अन्नाला चव येत नाही. काहीजण पदार्थांत वरून मीठ घेतात. मीठ घातलं नाही तर सर्व पदार्थ अळणी लागतात. जसजसे लोक हेल्दी लाईफस्टाईलकडे वळत आहेत तसतसं फॅन्सी फूड आयटम्सचा ट्रेंड्स वाढत आहे. यातीलच एक म्हणजे पिंक सॉल्ट म्हणजेच सैंधव मीठ  याला हिमालियन सॉल्ट असंही म्हणतात. असं मानलं जातं की यात जास्तीत जास्त मिनरल्स असतात. 

म्हणूनच हे मीठ साध्या आयोडीनयुक्त मीठाच्या तुलनेत चांगलं असतं. पण हा बदल जितका हेल्दी दिसतो तितका हेल्दी नाहीसुद्धा. बेंगलुरूचे फिटनेस कोच राल्स्टन डिसूजा यांनी २० फेब्रुवारीला आपल्या पोस्टमध्ये मिठाच्या सेवनाबाबत काही मुद्दे उपस्थित करून लोकांना रोजच्या आयुष्यात आयोडीनयुक्त मीठाऐवजी आयोडीनयुक्त मिठाचा आहारात समावेश करण्याच्या धोक्यांबाबत सांगितले आहे. (Know From Expert Consumption Of Pink Salt Beneficial Or Harmful For Health)

गुलाबी मिठात ट्रेस मिनरल्स जास्त असतात पण याचे फायदे खूपच कमी असतात.  त्याचे फायदे मिळवण्यासाठी हे मीठ जास्त प्रमाणात खायला हवं, जे आरोग्यासाठी योग्य नाही. आयोडीनसारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त गुलाबी मिठाची किंमत आयोडीनयुक्त मिठाच्या तुलनेत दुप्पट असते. जी आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकते.

भारतात आयोडीनची कमतरता

भारतीय लोकांच्या आहारात आयोडीनची कमतरता ही एक मोठी वैद्यकीय स्थिती आहे. १९६० च्या दशकात यामुळे थायरॉईड, गर्भावस्थेच्या समस्या, मानसिक विकार यांसारख्या गंभीर स्थिती उद्भवत आहेत. आयोडीन थायरॉईड फंक्शनला सपोर्ट करण्यास महत्वाची भूमिका बजावतो. याच्या कमतरतेमुळे हायपोथायरॉयडीझ्म किंवा इतर थायरॉईड डिसॉर्डर्स होऊ शकतात.

रोजच्या जेवणात नक्की कोणतं मीठ खावं?

सी सॉल्ट, पिंक सॉल्ट किवा अन्य मिनरल सॉल्ट डाएट ट्रेंडमुळे आकर्षक वाटू शकतात. पण रोजच्या जीवनात आयोडीनयुक्त मीठ एक स्वस्त आणि उत्तम उपाय आहे. बाहेरून फॅन्सी दिसणारा प्रत्येक पर्याय हा उत्तम नसतो. अनेकदा  साधारण आयोडीनयुक्त मिठामुळे तुम्हाला थायरॉईड हेल्थ आणि संपूर्ण पोषण सुरक्षा संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जेवणात वरून मीठ घेणं टाळा. आठवड्यातून एक  किंवा दोन वेळा हे सॉल्ट खाणं उत्तम ठरतं.

English
हिंदी सारांश
Web Title : Pink salt vs. regular salt: Which is better for health?

Web Summary : Pink salt, though trendy, isn't necessarily healthier than iodized salt. Experts warn against replacing iodized salt, crucial for thyroid function. While pink salt contains trace minerals, the benefits are minimal. Iodized salt remains a cost-effective way to combat iodine deficiency.
टॅग्स :हेल्थ टिप्सलाइफस्टाइल