Join us

कारल्याची भाजी चुकूनही होणार नाही कडू, ४ टिप्स-घरातले लहानमोठे आवडीने खातील कारलं मजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2025 19:21 IST

How To Get Rid Of Bitter Taste Of Karela: कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी या काही टिप्स पाहा.. यामुळे कारल्याचा कडूपणा तर कमी होईलच पण भाजीची चवही नेहमीपेक्षा जास्त खुलेल..(kitchen tips to remove bitterness of bitter gourd or karela)

ठळक मुद्देकारल्याची भाजी करण्यापुर्वी जर तुम्ही या काही गोष्टी करून पाहिल्या तर नक्कीच कारल्याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल.

कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच... असा अनुभव अनेकजणींना येतो. कारल्याची भाजी चवदार होण्यासाठी त्या अगदी मन लावून सगळे प्रयत्न करतात. पण तरीही कारल्याचा कडूपणा काही कमी होत नाही. त्यामुळे मग साहजिकच घरातल्या मंडळींकडून कारल्याची भाजी आवडीने खाल्ली जात नाही. मुलं तर त्या भाजीकडे बघायलाही तयार नसतात. पण कारलं कडू असलं तरी ते पौष्टिक असतंच. त्यामुळे थोडं का होईना पण सगळ्यांनी ते खायलाच हवं. त्यासाठीच या काही खास टिप्स पाहा (how to get rid of bitter taste of karela?). कारल्याची भाजी करण्यापुर्वी जर तुम्ही या काही गोष्टी करून पाहिल्या तर नक्कीच कारल्याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होईल. (kitchen tips to remove bitterness of bitter gourd or karela)

 

कारल्याचा कडवटपणा कमी होण्यासाठी टिप्स

कारल्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी पुढे ४ टिप्स सांगितल्या आहेत. त्यापैकी जी तुम्हाला सोपी वाटेल ती ट्राय करून पाहा..

दीप अमावस्या २०२५: कणकेचा दिवा करण्याची सोपी पद्धत- कमी तेलात दिवा जास्त वेळ उजळेल

१. मीठ

भाजीसाठी कारले चिरल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी घ्या. त्यात एखादा चमचा मीठ घाला. मीठ पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळल्यानंतर त्यात कारल्याच्या फोडी घाला. १० ते १५ मिनिट त्या पाण्यात तशाच राहू द्या. त्यानंतर मिठाच्या पाण्यातून काढून घ्या आणि साध्या पाण्याने धुवून घ्या. कडवटपणा कमी होईल.

 

२. दही 

एका पातेल्यामध्ये एक ते दोन चमचे दही घ्या. त्यात एक कप पाणी घालून त्याचं ताक करा. आता या ताकामध्ये थोडं मीठ घालून त्यात कारल्याच्या फोडी भिजत घाला.

फक्त वॉकिंग, सायकलिंगने सुटलेलं पोट कमी होत नाही! ४ गोष्टी करा- पोट होईल सपाट

१५ ते २० मिनिटांनी ताकातल्या कारल्याच्या फोडी काढून मग त्या भाजीसाठी वापरा. ताकातल्या फोडी पुन्हा धुवून घेण्याची गरज नाही.

 

३. चिंचेचं पाणी 

ताकाप्रमाणेच चिंचेच्या पाण्याचा वापर करूनही कारल्याचा कडवटपणा कमी करता येतो. त्यासाठी चिंचेचं अगदी पातळ पाणी करून घ्या. त्या पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे कारल्याच्या फोडी भिजत घाला. त्यानंतर त्या भाजीसाठी वापरा. चिंचेच्या पाण्यात भिजवलेल्या कारल्याच्या फोडी जर फ्राय करून खाल्ल्या तर त्या अधिक चवदार लागतात.  

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती