Lokmat Sakhi >Food > वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले...

वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले...

Kitchen Tips : Summer Special Food : Vlvanache Padartha Tayar Karnyasathi Tips : Cooking Tips & Tricks : यंदा उन्हाळयात वाळवणाचे पदार्थ तयार करणार असाल तर आधी या १० गोष्टी लक्षात ठेवाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 09:05 IST2025-03-04T09:00:00+5:302025-03-04T09:05:02+5:30

Kitchen Tips : Summer Special Food : Vlvanache Padartha Tayar Karnyasathi Tips : Cooking Tips & Tricks : यंदा उन्हाळयात वाळवणाचे पदार्थ तयार करणार असाल तर आधी या १० गोष्टी लक्षात ठेवाच...

Kitchen Tips Summer Special Food Vlvanache Padartha Tayar Karnyasathi Tips | वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले...

वाळवणाचे पदार्थ करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' १० गोष्टी, पदार्थ न फसता-वर्षभर टिकतील चांगले...

उन्हाळा आणि वाळवणाच्या पदार्थांचे खास असे अतूट नातेच आहे असे म्हणावे लागेल. उन्हाळा सुरु होताच अनेक घरांमध्ये वाळवणाचे पदार्थ तयार करण्याची रेलचेल फार मोठ्या प्रमाणांत सुरु होते. लोणची, पापड, मसाले असे अनेक वाळवणाचे पदार्थ हमखास तयार केले जातात. वर्षंभर पुरतील असे वाळवणाचे पदार्थ एकदाच (Kitchen Tips) मोठ्या प्रमाणावर केले जातात. वाळवणाचे पदार्थ (Summer Special Food ) खराब न होता किंवा त्यांना बुरशी न लागता वर्षभर चांगले टिकून राहावे यासाठी ते तयार करताना खूप काळजी घ्यावी लागते. वर्षभर टिकणारे वाळवणाचे पदार्थ तयार करणे वरवर पाहता जरी सोपे वाटत(Cooking Tips & Tricks)असेल तरीही ते फार अवघड काम असते.

वाळवणाचे हे पदार्थ तयार करणे म्हणजे एक प्रकारचे कसबचं असते, अतिशय संयम आणि मन लावून सगळे पदार्थ अगदी काळजीपूर्वक करावे लागतात. यातला एकही पदार्थ तयार करताना लहानातली लहान चूक जरी झाली तरी पदार्थ फसतो आणि सगळ्या मेहेनतीवर पाणी सांडून कष्ट वाया जातात. यासाठीच वाळवणाचे पदार्थ तयार करण्यापूर्वी काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासाठीच, यंदा तुमच्या घरी देखील वाळवणाचे पदार्थ तयार करण्याचा बेत आखला जात असेल तर हे पदार्थ तयार करण्यापूर्वी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे, त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूयात. वाळवणाचे पदार्थ तयार करण्यापूर्वी जर आपण या गोष्टींची काळजी घेतली तर हे पदार्थ तयार करताना आपली घाई - गडबड होणार नाही, तसेच वाळवणाचे पदार्थ देखील (Valvanache Padartha) झटपट तयार करून काम देखील पटकन उरकेल. 

वाळवणाचे पदार्थ तयार करण्यापूर्वी लक्षात ठेवाव्यात अशा काही आवश्यक टिप्स... 

१. वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू आहे. कारण या काळात उन्हाची तीव्रता सर्वात जास्त असते. यासाठी वर्षभर टिकणारे वाळवणाचे पदार्थ शक्यतो याच उन्हाळ्याच्या ऋतूंत करावेत. 

२. कोणत्याही प्रकारचे वाळवणासाठीचे पदार्थ तयार करताना लागणारे पदार्थ किंवा बेसिक साहित्य हे नेहमी ताजे, चांगल्या दर्जाचे आणि शक्यतो नवीनच विकत आणावे. जेणेकरून वाळवणाचे पदार्थ वर्षानुवर्षे खराब न होता चांगले टिकून राहतात. शक्यतो आधीच आणलेले किंवा फार पूर्वीच डब्यांत स्टोअर करुन ठेवलेले जिन्नस वाळवणाचे पदार्थ तयार करण्यासाठी वापरु नयेत. या जुन्या पदार्थांच्या वापराने पदार्थ फसू शकतो किंवा वर्षभर न टिकता लवकर खराब होऊ शकतो. 

Special Marathi Food: अस्सल मराठी चवीच्या वरणाचे ७ प्रकार, वाफाळत्या भातावर हवंच गरमागरम वरण!

३. वाळवणाचे पदार्थ उन्हांत वाळवताना स्वच्छ आणि हवेशीर जागेची निवड करा. या पदार्थांना पुरेशा प्रमाणांत सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या. 

४. वाळवणाचे पदार्थ उन्हांत वाळवताना त्यावर धूळ, माती किंवा घाण बसू नये तसेच कीटक,माशा बसू नयेत यासाठी जाळीदार जाळ्यांचा वापर करावा. आपण एकदम पातळसर नायलॉनच्या ओढण्यांचा देखील वापर करु शकतो. यामुळे पदार्थ झाकले जाऊन देखील सहज वाळतात. 

अरे देवा ! पॅनमध्ये बटर घालताच करपते - जळका वास येतो? ६ टिप्स, बटर न जळता स्वाद होईल दुप्पट...

५. वाळवणाचे पदार्थ वाळवण्यासाठीची जागा नेहमी कोरडी असावी. ओलसर जागेत पदार्थ व्यवस्थित वाळत नाहीत तसेच यामुळे पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता असते. 

६. वाळवणाचे पदार्थ नेहमी सकाळी लवकर बनवावेत म्हणजे दिवसभर उन्हांत राहून ते अगदी व्यवस्थितपणे सुकतात. 

फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही!

७. उन्हाळी वाळवणाचे पदार्थ ज्या दिवशी तयार करणार त्या दिवशी आधी वातावरणाचा योग्य तो अंदाज घ्यावा. फार कमी ऊन किंवा ढगाळ वातावरण असेल तर वाळवणाचे पदार्थ तयार करणे शक्यतो टाळावेत. 

८. उन्हाळी वाळवणाचे जे पदार्थ वाळायला जास्त वेळ लागतो जसे की, कुरडई, सांडगे असे पदार्थ शक्यतो ज्या दिवशी कडक ऊन असेल त्याच दिवशी बनवावेत, म्हणजे ते संपूर्णपणे नीट वाळून वर्षभर चांगले टिकून राहतात. 

९. वाळवणाचे पदार्थ साठवण्यासाठी आपण ज्या डब्यांचा किंवा कंटेनरचा वापर करणार असाल ते आधीच स्वच्छ धुवून, पुसून उन्हात व्यवस्थित वाळवून ठेवून द्यावेत. जेणेकरून पदार्थ तयार झाल्यावर ते लगेच डब्यांत स्टोअर करता येतील.  

१०. वाळवणाचे पदार्थ साठवताना डब्याच्या तळाशी एक पेपर अंथरुन मग त्यावर सगळे पदार्थ ठेवावेत. त्याचबरोबर वर्षातून २ किंवा ३ वेळा जसा वेळ मिळेल तसेच या पदार्थांना पुन्हा एकदा ऊन दाखवावे.

Web Title: Kitchen Tips Summer Special Food Vlvanache Padartha Tayar Karnyasathi Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.