Lokmat Sakhi >Food > Kitchen Tips : झटपट आणि उत्तम स्वयंपाक करण्याच्या ५ सोप्या टिप्स, वेळही वाचेल आणि कामही लवकर उरकेल...

Kitchen Tips : झटपट आणि उत्तम स्वयंपाक करण्याच्या ५ सोप्या टिप्स, वेळही वाचेल आणि कामही लवकर उरकेल...

Kitchen Tips: थोडे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपण झटपट आणि उत्तम स्वयंपाक करु शकतो. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 01:48 PM2022-03-03T13:48:09+5:302022-03-03T13:54:51+5:30

Kitchen Tips: थोडे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपण झटपट आणि उत्तम स्वयंपाक करु शकतो. त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते पाहूया...

Kitchen Tips: 5 simple tips for quick and good cooking, time will be saved and work will be done quickly ... | Kitchen Tips : झटपट आणि उत्तम स्वयंपाक करण्याच्या ५ सोप्या टिप्स, वेळही वाचेल आणि कामही लवकर उरकेल...

Kitchen Tips : झटपट आणि उत्तम स्वयंपाक करण्याच्या ५ सोप्या टिप्स, वेळही वाचेल आणि कामही लवकर उरकेल...

Highlightsगोष्टींची तयारी आधीच करुन ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचेल. इतकेच नाही तर तयारी असल्याने आपणही निश्चिंत राहू आणि स्वयंपाक चविष्ट होण्यास मदत होईल. आदल्या रात्रीच उद्या काय करायचे हे नक्की असेल तर झोपण्यापूर्वी थोडी किमान तयारी करता येते.

सकाळी झोपेतून उठलं की महिलांची सगळ्यात आधी घाई असते ती स्वयंपाकाची. एकीकडे ब्रेकफास्ट, एकीकडे डब्याची तयारी, त्यात कोणाला काय आवडते, कोणाचे पथ्य यानुसार स्वयंपाक केला जातो (Cooking hacks) . महिला वर्गाचा सर्वाधिक वेळ जाणारे काम म्हणजे स्वयंपाकाचे. यातही स्वयंपाकाबरोबरच इतर लहानसहान कामात जास्त वेळ जातो. इतके सगळे करुनही भाजीत हे जास्त झालं आणि पोळ्या अशा झाल्या अशा तक्रारी घरच्यांकडून असतातच. पण थोडे योग्य पद्धतीने नियोजन केले तर आपण झटपट आणि उत्तम स्वयंपाक करु शकतो (Kitchen Tips). त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते पाहूया...

(Image : Google)
(Image : Google)

१. नियोजन महत्त्वाचे 

दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला, जेवायला आणि रात्रीसाठी काय करायचे याचे नियोजन आधीच करुन ठेवा. म्हणजे ऐनवेळेला आता काय करायचे इथपासून सुरुवात होणार नाही. डोक्यात काय करायचे हे एकदा नक्की असेल की उठल्यावर झटपट कामाला लागता येते. इतकेच नाही तर आदल्या रात्रीच उद्या काय करायचे हे नक्की असेल तर झोपण्यापूर्वी थोडी किमान तयारी करता येते. रात्री काय करायचे हे ठरले असेल तर सकाळचे सगळे आवरल्यावर त्याची तयारी करता येते. 

२. भाज्या साफ करणे

भाज्या साफ करणे हे सगळ्यात महत्त्वाचे काम असते. घाईच्या वेळी भाज्या निवडलेल्या, चिरलेल्या तयार असतील तर फारसा वेळ जात नाही. त्यामुळे आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी पालेभाज्या निवडून ठेवणे, लसूण सोलून ठेवणे, गवार, पापडी यांसारख्या भाज्या निवडून ठेवल्यास झटपट भाजी टाकता येते. 

३. डबे रिकामे नाहीत ना तपासा 

आपण स्वयंपाक करायला घेतला की डब्यात साखरच नाही, दाण्याचा कुटच संपला आहे किंवा गूळ फोडलेला नाही असे होते. मग घाईच्या वेळी आपला यामध्ये खूप वेळ जातो. त्यापेक्षा आठवड्याची सुट्टी असेल तेव्हा किंवा संध्याकाळी थोडे निवांत असताना मिसळणाच्या डब्यातील सगळे पदार्थ भरलेले आहेत न हे पाहावे, साखर, मीठ, गूळ, दाण्याचा कूट यांचे डबे आधीच भरुन ठेवावेत.

(Image : Google)
(Image : Google)

४. भाजी, आमटीसाठी लागणारे वाटण

बऱ्याचदा आपल्याला काही भाज्या किंवा उसळी यांच्यासाठी वाटण लागते. अशावेळी खोबरे किसलेले किंवा वाटलेले असणे गरजेचे असते. ऐनवेळी खोबरे वाटत बसल्यास खूप वेळ जातो. त्यापेक्षा सुट्टीच्या दिवशी खोबरे वाटून ठेवावे. इतकेच नाही तर आलं लसूण पेस्ट ही जेवणात अनेकदा लागणारी गोष्ट. लसूण सोललेला असला तरी मिक्सरवर आलं, लसूण बारीक करण्यात घाईच्या वेळी वेळ जातो. अशावेळी आलं-लसूण पेस्ट तयार असेल तर काम झटपट होते. 

५. इतर तयारी

याशिवाय कडीपत्ता, कोथिंबीर निवडून ठेवणे, धनेजीरे पूड आधीच करुन ठेवणे, ताजा मसाला लागत असेल तर खडा मसाला तेलावर गरम करुन तो मिक्सर करुन ठेवणे, मिरपूड, वेलची पूड करुन ठेवणे अशा लहान वाटणाऱ्या पण घाईच्या वेळी झटपट हाताशी येतील अशा गोष्टींची तयारी आधीच करुन ठेवल्यास स्वयंपाकाचा वेळ वाचेल. इतकेच नाही तर तयारी असल्याने आपणही निश्चिंत राहू आणि स्वयंपाक चविष्ट होण्यास मदत होईल. 

 

Web Title: Kitchen Tips: 5 simple tips for quick and good cooking, time will be saved and work will be done quickly ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.