प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला वांगे बाजारात पाहायला मिळतात. वांग्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. वांग्याची भाजी, वांग्याची आमटी, वांग्याची डाळ, वांग्याचे काप याव्यतिरिक्त वांग्याचे भरीत देखील आवडीने खाल्ले जाते. (Authentic village style vangyach bharit)गरमागरम तांदळाची भाकरी आणि त्यासोबत झणझणीत वांग्याचे भरती खाण्याची मजा काही औरच... (Jalgaon special vangyache bharit)
अनेकदा घरात वांग्याचे भरीत केल्यानंतर मुले खाण्यासाठी नाटक करतात. त्याची चव देखील थोडी गोड लागते. काही वांग्यांमध्ये बिया जास्त असल्यामुळे त्याची चव देखील बिघडते.(Khandeshi bharit kase banvayche) त्यामुळे वांग्याचे भरीत फारसे चांगले होत नाही. अनेकदा घरी वांग्यांचे भरीत बनवताना गॅसवर भाजतो ज्यामुळे त्याला स्मोकी चव येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे वांग्याची चुकीची निवड आणि बनवण्याची पद्धत. खान्देशी संस्कृतीत भरीत बनवण्याचे काही खास नियम आहेत.(Zanjit vangyache bharit marathi) निखाऱ्यावर किंवा गॅसवर भाजलेल्या वांग्याचा गर जेव्हा लसूण-मिरचीच्या झणझणीत ठेक्यासोबत एकत्र होतो, तेव्हा तयार होणारे भरीत कोणत्याही पंचपक्वान्नापेक्षा सरस ठरते. वांगी निवडताना नेहमी मोठी, गोलाकार आणि काटेरी हिरवी वांगी निवडावीत. ही वांगी चवीला गोड असतात.(Bharit sathi vangi kashi nivdaychi) वांगं हातात घेतल्यावर ते वजनाला 'हलके' असावे. हलके वांगं म्हणजे त्यात बिया कमी आणि गर जास्त असतो. जड वांग्यात बिया जास्त असल्याने भरीत कडवट लागू शकते. पण जर आपल्यालाही घरी हॉटेलसारख चविष्ट खान्देशी पद्धतीचं वांग्याचे भरती बनवायचे असेल तर पाहूया साहित्य आणि कृती
स्वयंपाकघरात 'असा' साठवा लसूण, महिनोंमहिने होणार नाही खराब, बुरशीचंही नो टेन्शन, काळाही पडणार नाही
साहित्य
वांगे- ३
मिरची - ५ ते ६
लसूण पाकळ्या - १० ते १२
कोथिंबीर - १ वाटी
तेल - २ चमचा
जिरे - १ चमचा
भाजलेले शेंगदाणे - १ वाटी
बारीक चिरलेली कांद्याची पात - १ वाटी
मीठ - चवीनुसार
कृती
1. सगळ्यात आधी वांग स्वच्छ धुवून त्याला तेल लावा. गॅसवर जाळी ठेवून वांगी आणि हिरव्या मिरच्यांना मध्यभागी कापून छान भाजून घ्या. भाजलेली वांगी पूर्ण गार झाल्यावर त्याचा जळालेला भाग काढून टाका आणि वांग व्यवस्थित घोटून घ्या.
2. भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण एकत्र कटून घ्या. कढईमध्ये तेल गरम करुन त्यामध्ये जिरे घाला. त्यामध्ये तयार केलेला हिरवी मिरची-लसूण ठेचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिनिटभर परता.
3. यामध्ये शेंगदाणे, कांद्याची पात आणि किंचित मीठ घालून दोन मिनिटं परता. नंतर त्यामध्ये घोटलेलं वांग घाला, चवीनुसार मीठ घाला. मिक्स करा आणि दोन मिनिटे वाफ काढा. गरमागरम तांदळ्याच्या भाकरीसोबत खा.
