खोबऱ्याची चटणी, दाण्याची चटणी, जवसाची चटणी अशा वेगवेगळ्या चटण्या नेहमीच आपल्या रोजच्या जेवणात असतात. कारण चटपटीत चटण्या जेवणात तोंडी लावायला असल्या की जेवणाची रंगत वाढत जाते. शिवाय चटणी खाणं ही जिभेसाठी नुसती चंगळ नाही. कारण त्या आपण थोड्याशा जरी खात असलो तरी तब्येतीसाठी त्या खूप पौष्टिक असतात (kathiyawadi lasun chutney recipe). आता आपल्याकडच्या पारंपरिक चटण्या खाऊन थोडा कंटाळा आला असेल आणि चवबदल हवी असेल तर काठीयावाडी पद्धतीने लसूण चटणी करून पाहा.(how to make kathiyawadi garlic chutney recipe?)
काठीयावाडी लसूण चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१०० ग्रॅम लसूण
१ टीस्पून शाही जिरे
५० ग्रॅम तूप
नव्या नवरीसाठी बनारसी शालूचे सुंदर डिझाईन्स.. बघा पारंपरिक साड्यांचा अधुनिक साज, ६ आकर्षक रंग
१ टीस्पून हिंग
लाल तिखट ७० ग्रॅम
५० ग्रॅम दही आणि चवीनुसार मीठ
कृती
काठीयावाडी लसूण चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी लसूण व्यवस्थित साेलून घ्या. यानंतर एक खलबत्ता घ्या. त्यामध्ये लसूण आणि जिरे घाला आणि लसूण जाडसर ठेचून घ्या. जर तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरमधून जिरे आणि लसूण जाडेभरडे फिरवून घेतले तरी चालेल.
केसांच्या सगळ्याच तक्रारी होतील गायब! रोज 'हे' पदार्थ खा- केस होतील दाट, लांब, काळेभोर
यानंतर एका वाटीमध्ये तिखट घ्या आणि पाणी घालून ते कालवून घ्या. आता गॅसवर एक छोटी कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये लसूण आणि जिरे घाला आणि ते परतून घ्या. लसूण लालसर परतून झाल्यानंतर त्यात पाणी घातलेलं तिखट घाला. थोडं दही आणि चवीनुसार मीठ घाला. सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की चटणीला चांगली उकळी येऊ द्या. चटणी छान शिजली की काठीयावाडी लसूण चटणी तयार.
