कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच! अशी कडू कारल्याची ओळख आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. कारल्याची चव कडू असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खायला नाकं मुरडतात. कारल्याची चव कडू असल्याने बऱ्याचजणांना कारल्याची भाजी नकोशी वाटते. कारलं चवीला कडू (Karela Chutney) असलं तरी ते खाणे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असत. त्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात(How To Make Karela Chutney At Home).
कारल्यात असणाऱ्या आरोग्यदायी गुणधर्मामुळेच कारल्याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु कारल्याच्या कडू चवीमुळेच आपण भाजी खायला नको म्हणतो, अशावेळी आपण कारल्याची चटपटीत चटणी करून खाऊ शकतो. कारल्याची चटणी मुळातच खूप चविष्ट आणि रुचकर लागते, परंतु त्यातले मसाले, कोथिंबीर, लसूण, चिंच-गूळ यांसारख्या घटकांमुळे ती अधिकच स्वादिष्ट बनते. याशिवाय ही चटणी पचनास मदत करणारी, साखर नियंत्रणात ठेवणारी आणि रक्तशुद्धी करणारी असते. यासाठीच, कारल्याची चटणी तयार करण्याची पारंपरिक रेसिपी पाहूयात(Karela Chutney Recipe).
साहित्य :-
१. कारली - ३ ते ४
२. शेंगदाणे - १/४ कप
३. चणा डाळ - २ टेबलस्पून
४. पांढरी उडीद डाळ - २ टेबलस्पून
५. धणे - २ टेबलस्पून
६. जिरे - १ टेबलस्पून
७. कडीपत्ता - २० ते २५ पानं
८. लाल सुक्या मिरच्या - १० ते १५ सुक्या मिरच्या
९. चिंच - २ टेबलस्पून
१०. हिंग - १/२ टेबलस्पून
११. तेल - २ ते ३ टेबलस्पून
१२. लसूण पाकळ्या - ४ ते ५ पाकळ्या
१३. मीठ - चवीनुसार
शिळ्या पोळ्या आणि डाळीचे डोसे? विश्वास नाही बसणार पण ‘असे’ डोसे करुन पाहा, कोंड्याचा मांडा...
कांदा-लसणाला हिरवे कोंब फुटले, टाकून द्यावे लागतात? १ उपाय-कांदा लसूण लवकर खराब होणार नाही...
कृती :-
१. सगळ्यात आधी कारली स्वच्छ धुवून ती व्यवस्थित वाळवून घ्यावी. आता कारल्याचे छोटे छोटे पातळ बारीक काप करून घ्यावेत.
२. आता एका कढईत शेंगदाणे घेऊन ते कोरडे भाजून घ्यावेत. त्यानंतर, चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, धणे, जिरे, कडीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, चिंच असे सगळे जिन्नस एकामागून एक घालून एकत्रित भाजून घ्यावेत. सगळे जिन्नस थोडे भाजून झाल्यावर त्यात चवीनुसार हिंग घालावे.
३. सगळे भाजून घेतलेले जिन्नस एका मोठ्या डिशमध्ये काढून थोडे गार होऊ द्यावेत.
४. आता त्याच कढईत तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या सालीसकट घालाव्यात. लसूण पाकळ्या तळून एका डिशमध्ये काढून घ्याव्यात.
एका मिनिटांत काढा किलोभर भाजलेल्या शेंगदाण्याची टरफलं! रणबीर ब्रारची पाहा १ भन्नाट ट्रिक...
५. त्याच कढईत पुन्हा तेल घेऊन त्यात कारल्याचे काप कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे. कारल्याचे काप कुरकुरीत झाल्यावर ते काढून घ्यावेत.
६. आता एका मिक्सरच्या मोठ्या भांडयात सगळे भाजून घेतलेले जिन्नस आणि तळून घेतलेले कारल्याचे काप घालावेत. यात चवीनुसार मीठ घालावे.
७. सगळे जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेऊन त्याची जाडसर भरड करून घ्यावी.
कारल्याची मस्त चटपटीत सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही चटणी एका हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवल्यास, २ ते ३ महिने ही चटणी चांगली टिकते. आपण डाळ, भात किंवा चपाती सोबत ही चटणी तोंडी लावायला म्हणून खाऊ शकतो.