Join us

गणपतीच्या स्वागताला कोकणात हवेच काकडीचे धोंडस! अस्सल पारंपरिक कोकणी पदार्थ-चव आजीपणजीच्या हातचीच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2025 17:00 IST

Kakdiche Dhondas Recipe : Cucumber Cake Recipe : Kakdiche Dhondas Malvani Recipe : कोकणी माणसाच्या मनाला आणि जिभेला तृप्त करणाऱ्या पारंपरिक गोड धोंडसची खास रेसिपी...

श्रावण महिना म्हणजे कोकणात सण, उत्सव आणि पारंपरिक पदार्थांची रेलचेल असणारा काळ. या खास महिन्यांत सणावाराला केल्या जाणाऱ्या विशेष  पाककृतींपैकी (Cucumber Cake Recipe) एक म्हणजे 'काकडीचा गोड धोंडस'... श्रावण महिन्यांत येणाऱ्या गणेशोत्सवा दरम्यान प्रत्येक कोकणी घराघरात केला जाणारा एक पारंपारिक आणि चविष्ट पदार्थ म्हणजे काकडीचा गोड धोंडस. हा धोंडस फक्त एक पदार्थ नसून तो कोकणी संस्कृतीचा (Kakdiche Dhondas Recipe) आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा एक भाग आहे(Kakdiche Dhondas Malvani Recipe).

धोंडस हा केकसारखा दिसतो, पण तो तांदुळाचे पीठ, गूळ आणि खास हिरवीगार काकडी यांसारख्या पौष्टिक पदार्थांपासून तयार केला जातो. नारळाच्या दुधासोबत त्याची चव अधिकच उत्तम लागते. वाफेवर शिजवलेला हा पदार्थ अतिशय मऊसूत आणि पौष्टिक असतो. विशेषतः हा पदार्थ कोकणात गणपतीच्या नैवेद्यासाठी आवर्जून तयार केला जातो कारण तो वाफेवर शिजतो आणि शाकाहारी असतो. या काळात अनेक लोक मांसाहार करत नाहीत, त्यामुळे धोंडससारखे पारंपरिक आणि सात्विक पदार्थ तयार करण्याला प्राधान्य दिले जाते. कोकणातील अनेक घरांमध्ये गणपतीच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी धोंडसचा नैवेद्य दाखवला जातो. हा पदार्थ चविष्ट, पौष्टिक आणि पोटासाठी हलका असतो. पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम धोंडसाचा गोड सुगंध घरभर पसरतो आणि सणासुदीच्या गोड आठवणी जागवतो. कोकणी माणसाच्या मनाला आणि जिभेला तृप्त करणाऱ्या या पारंपरिक गोड धोंडसची खास रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. काकडीचा किस / तवसा - १ कप (किसलेला)२. उकडे तांदूळ - १ कप (भाजून फुलवून घेतलेले)३. शेंगदाणे - १/२ कप (कोरडे भाजून घेतलेले)४. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ५. गूळ - १ कप (किसलेला)६. ओलं खोबरं - १/२ कप ७. वेलची पूड - १/२ टेबलस्पून ८. दालचिनी पूड - १/२ टेबलस्पून ९. पाणी - गरजेनुसार१०. हळदीची पाने - ४ ते ५ पाने 

भुरभुर पावसात प्या स्पेशल राजवाडी गरमगरम चहा, पाहा ही खास रेसिपी... 

शिळ्या इडल्यांचे पाहा ८ पदार्थ, खूप इडली उरली तर बिंधास्त करा आणि पोटभर चविष्ट पदार्थ खा....

कृती :- 

१. सगळ्यात आधी काकडी किसून त्याचा बारीक किस करुन घ्यावा. त्यानंतर, शेंगदाणे कोरडे भाजून मिक्सरला वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी. मग उकडे तांदूळ कोरडे भाजून फुलवून घ्यावेत, त्यानंतर मिक्सरला वाटून त्याची भरड करावी ही भरड बारीक जाळीदार चाळणीने चाळून घ्यावी. २. आता एका मोठ्या भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात काकडीचा किस व गूळ घालूंन सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावे. या मिश्रणात शेंगदाणा व उकड्या तांदुळाची भरड घालावी. ३. याच मिश्रणात ओलं खोबरं, वेलची - दालचिनीची पूड घालावी. त्यानंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

पाहा पोळपाट लाटणं धुण्याची योग्य पद्धत-१ ट्रिक, साबण-पावडर नको-टिकेल अनेक वर्ष...

४. मग गॅसची आच मोठी करून त्यावर झाकण ठेवून हे धोंडस शिजवत ठेवावं. धोंडस ६० ते ७० % शिजल्यावर तयार मिश्रणावर हळदीची पाने व्यवस्थित पसरवून लावून घ्यावीत. ५. मग गॅसच्या मध्यम आचेवर एक तवा ठेवून त्यावर हे भांडं ठेवून तासभर धोंडस शिजवत ठेवावा. ६. धोंडस व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करून रात्रभर धोंडस त्याच भांड्यात ठेवून तसाच मुरु द्यावा. ७. दुसऱ्या दिवशी टोपाच्या कडांवरून बारीक सूरी फिरवून धोंडस टोपापासून मोकळा करून अलगद काढून घ्यावा. 

कोकणची खासियत असलेला पारंपरिक काकडीचा गोड धोंडस खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृतीश्रावण स्पेशलश्रावण स्पेशल पदार्थगणेश चतुर्थीगणेश चतुर्थी रेसिपी