दिवाळीच्या दिवस म्हटले की सगळीकडे आनंद, उत्साह असतो. या दिवसांमध्ये आपण घरात तर लाडू, चिवडा, करंजी, शंकरपाळे, शेव, चकल्या असे फराळाचे वेगवेगळे पदार्थ तर करतच असतो. पण तरीही या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काही विशेष मेन्यूही हौशीने केलाच जातो. म्हणूनच या दिवाळीत तुमच्याघरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी चमचमीत काजू करीचा बेत करा. या रेसिपीने केलेली काजू करी एवढी चवदार होईल की नंतर रेस्टॉरंटमध्ये जाऊन काजू करी खाणं सगळेच विसरून जातील (Kaju Curry Recipe). तुमच्या हातच्या काजू करीची फर्माहिशच नेहमी होत राहील.(how to make kaju curry at home?)
रेस्टॉरंटस्टाईल चमचमीत काजू करी रेसिपी
साहित्य
पाऊण वाटी काजू
२ ते ३ मध्यम आकाराचे टोमॅटो
२ ते ३ मध्यम आकाराचे कांदे
संकष्टी चतुर्थीला करा रताळ्याचा किस- करायला सोपा आणि पोटासाठी दमदार- घ्या पौष्टिक रेसिपी
चवीनुसार लाल तिखट आणि मीठ
१ टेबलस्पून आलं, लसूण पेस्ट
चिमूटभर हळद
धने पूड, गरम मसाला, जीरेपूड आणि किचन किंग मसाला प्रत्येकी एकेक चमचा
कृती
सगळ्यात आधी काजू अर्धा ते पाऊण तास दुधामध्ये भिजायला टाका. त्यानंतर अर्धे काजू मिक्सरमध्ये घालून त्यांची पेस्ट करा आणि अर्धे काजू तुपामध्ये खरपूस तळून घ्या.
यानंतर कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापल्यानंतर त्यात १ चमचा बटर आणि १ चमचा तेल घाला. तेल तापल्यानंतर त्यात एक ते दोन तेजपान घाला.
यानंतर चिमूटभर हळद घालून घ्या आणि बारीक चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आलं- लसूण पेस्ट घालून परतून घ्या. यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून ती देखील तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये काजूची पेस्ट, तिखट, मीठ आणि इतर सगळे मसाले घाला आणि थोडं पाणी घालून सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या. या मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात परतून घेतलेले काजू घाला. सगळ्यात शेवटी कसूरी मेथी बारीक करून घातली की काजू करी झाली तयार..