Join us

काजोलला फार आवडते गूळ-तूप-पोळी! तुम्हाला आवडतो का आजी करायची तसा गुळतूपपोळीचा लाडू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2023 19:52 IST

Kajol Loves Jaggery Ghee Poli काजोलने नुकतंच आपल्या कंफर्ट फूड संदर्भात माहिती दिली. तिला गूळ, चपाती आणि तूप प्रचंड आवडते.

बॉलिवूड अभिनेत्री काजोल आपल्या नटखट अंदाजासाठी ओळखली जाते. काजोल आपली स्माईल यासह फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. ती खाण्याची प्रचंड शौकीन आहे. तिचा आवडता पदार्थ खिचडी आहे. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिने कंफर्ट फूड संदर्भात माहिती दिली आहे. तिला चपातीवर गूळ यासह तूप खायला प्रचंड आवडते. हा पदार्थ अनेक ठिकाणी खाल्ला जातो. आपल्या घरात आजीबाई अथवा आईने देखील खाऊच्या डब्ब्यात गुळतूपपोळीचा लाडू दिला असेल. आपण लहानपणी हा लाडू मिटक्या मारत खायचो. त्यातील गुणधर्म आपल्या शरीरात पौष्टिक घटक देतात.

गूळ आणि तुप नियमित खाल्ल्याने पचनसंबंधित त्रास उद्भवत नाही. जर एखाद्याला बद्धकोष्ठताचा त्रास असेल तर, त्यांनी गूळ आणि तुपाचे सेवन करावे. याने नक्की फरक जाणवेल. गूळ आणि तुपात आयरन असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. यासोबतच ते शरीराला उबदार आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण ठेवते.

आपण गूळ, तूप आणि चपाती २ पद्धतीने खाऊ शकता.

पहिली पद्धत म्हणजे आपण चपातीवर गूळ आणि तूप लावून खाऊ शकता. याने प्रत्येकाचे पोषक तत्वे मिळतील.

दुसरी पद्धत म्हणजे आपण चपातीच्या आता गुळाचे सारण भरून तुपात भाजून खाऊ शकता.

गूळ, चपाती आणि तूप योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे. हिवाळ्यात स्वतःला आतून उबदार बनवण्यासाठी ही पौष्टिक चपाती मदत करेल. गूळ आणि तुपातले पोषक गुणधर्म शरीर निरोगी आणि रोगप्रतकारकशक्ती वाढवण्यास मदत करेल. मात्र, तुपाचे अती सेवन करू नये, याने शरीरात सुस्ती देखील येऊ शकते.

टॅग्स :काजोलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.