कैरीचा हंगाम आता जवळपास संपत आला आहे. यानंतर थेट पुढच्या उन्हाळ्यातच कैऱ्या आपल्या भेटीला येतात. त्यामुळे पुढचे काही दिवस तरी कैरीचा आस्वाद घेता यावा यासाठी कैरीचे वेगवेगळे पदार्थ तयार करून ठेवण्याची घाई सध्या अनेक घरांमध्ये दिसून येत आहे. त्यात लोणचं, साखरआंबा, गुळांबा, तक्कू, सकुबद्धा हे पदार्थ अग्रणी असतात. आता या पदार्थांच्याच जोडीला कैरीची चटणीही करून पाहा. ही चटणी तुम्ही जर फ्रिजमध्ये ठेवली तर ती अगदी वर्षभर चांगली टिकते (Kairichi Chutney Recipe in Marathi). पोळी, पराठा, डोसा हे पदार्थ तुम्ही त्या चटणीला लावून खाऊ शकता (how to make long lasting raw mango chutney?). शिवाय भात, खिचडी यांच्यासोबत जर ती तोंडी लावायला असेल तर जेवणाची मजा निश्चितच जास्त वाढते.(raw mango chutney recipe in Marathi)
वर्षभर टिकणारी कैरीची चटणी कशी करायची?
२ ते ३ मोठ्या आकाराच्या कैऱ्या (तुम्हाला किती चटणी करायची आहे, त्यानुसार हे प्रमाण कमी- जास्त करावे.)
२ चमचे तिखट
साधारण दिड ते दोन वाटी साखर
Health Tips: डॉक्टर सांगतात कॅन्सरचा धोका कमी करणारे 'हे' पदार्थ रोज खायलाच हवेत
चवीपुरतं मीठ
१ चमचा जिरेपावडर
१ चमचा धने पावडर
कृती
कैरीची चटणी करण्यासाठी कैऱ्या स्वच्छ धुवून घ्या आणि त्याचे देठ आणि देठाजवळचा काही भाग काढून टाका. यानंतर कैरीची सालं काढून घ्या आणि त्याचे बारीक काप करा.
चष्म्याला काही दिवसांतच कराल बाय बाय! रोज 'हे' काम करा- नजर होईल तेज
कैरीचे काप कुकरच्या डब्यामध्ये घाला. त्यात थोडं पाणी घालून ते कुकरमध्ये ठेवून शिजवून घ्या. खूप जास्त पाणी घालू नये. यानंतर शिजवलेली कैरी थंड होऊ द्या आणि ती मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये कैरीचा मिक्सरमधून वाटून घेतलेला गर घाला. त्यामध्ये मीठ घाला आणि ८ ते १० मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या. आता कैरीचा गर जर २ वाट्या असेल तर त्यामध्ये एक ते दिड कप याप्रमाणात साखर घाला.
परीक्षा, इंटरव्ह्यूचं टेन्शन? घ्या उपाय- ५ मिनिटांत सगळा स्ट्रेस जाईल- एन्झायटी कमी होईल
त्याचवेळी जिरेपूड, धनेपूड आणि तिखट घाला. सगळं मिश्रण एकदा हलवून घ्या. सुरुवातीला साखरेचा पाक होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण आळून यायला सुरुवात होईल त्यानंतर मिश्रण व्यवस्थित शिजले आहे असं लक्षात आल्यानंतर गॅस बंद करा. कैरीची चटपटीत चटणी तयार. चटणी थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवा.