उन्हाळा म्हटलं की कैरीची आंबट-गोड चव सगळ्यांच्या मनाला भुरळ घालते. कैरीपासून तयार होणारे विविध पदार्थ जसे की पन्हं, लोणचं आणि चटण्या आपण आवडीने खातो, पण कैरीचा जाम हा देखील तितकाच चविष्ट आणि खास पर्याय आहे. घरच्या घरी सहज बनवता येणारा हा जाम ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत अप्रतिम लागतो. कमी साहित्यांत आणि सोप्या पद्धतीने तयार होणारी ही रेसिपी एकदा करून पाहिली, तर पुन्हा पुन्हा बनवण्याचा मोह आवरणार नाही(how to make kairi jam at home).
ब्रेड, चपाती किंवा पराठ्यासोबत हा आंबट-गोड जाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच पसंतीस उतरेल अशी अप्रतिम चव आहे. विशेष म्हणजे, बाजारात मिळणाऱ्या प्रिजर्व्हेटिव्हयुक्त जामपेक्षा घरी बनवलेला हा जाम आरोग्यासाठीही उत्तम असतो. कमीत कमी साहित्यात आणि कोणत्याही आर्टीफिशियल प्रिझर्व्हेटिव्ह शिवाय तयार होणारा हा जाम चवीला इतका (homemade raw mango jam) अप्रतिम लागतो की मुलं विकतचा जाम विसरून जातील. आंबट-गोड आणि जिभेवर रेंगाळणारी चव असलेला 'कैरीचा जाम' घरच्याघरीच करण्याची साधीसोपी रेसिपी...
साहित्य :-
१. कैऱ्या - ३ ते ४२. पुदिन्याची पाने - ३ ते ४ पाने ३. काळीमिरी - ३ ते ४ दाणे४. साखर - १ कप ५. साजूक तूप - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार
कृती :-
१. सगळ्यात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून त्यावरील हिरवीगार साल काढून कैरीचे छोटे - छोटे तुकडे करून घ्यावेत. २. कैरीचे छोटे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात पुदिन्याची पाने व थोडे काळीमिरीचे दाणे घालावेत. मग मिश्रण एकत्रित वाटून त्याची पातळसर अशी पेस्ट तयार करून घ्यावी.
आंबा न कापताच ओळखा तो चवीला गोड की आंबट? ८ ट्रिक्स - आंबा खरेदी करताना करू नका 'या' चुका...
फिटनेस फ्रिक अक्षयकुमारला आवडते ‘तसे’ करा मँगो आइस्क्रिम, मनसोक्त खाऊनही वजन वाढणार नाही...
३. एका पॅनमध्ये साजूक तूप गरम करून त्यात ही मिक्सरमध्ये वाटून घेतलेली तयार पेस्ट गाळणीच्या मदतीने गाळून घालावी. ४. चमच्याने हळूहळू मिश्रण हलवत राहावे, मग या कैरीच्या पल्पमध्ये चवीनुसार साखर घालावी. संपूर्ण मिश्रण पूर्णपणे पारदर्शक होईपर्यंत चमच्याने हलवत राहून व्यवस्थित शिजवून घ्यावे. ५. मिश्रण पूर्ण पारदर्शक आणि थोडे मध्यम घट्टसर झाल्यावर गॅस बंद करून कैरीचा जाम थोडा थंड होऊ द्यावा.
कैरीचा जाम थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरुन स्टोअर करून ठेवावा. आंबट - गोड चवीचा हा कैरीचा जाम तुम्ही चपाती किंवा ब्रेडसोबत खाऊ शकता.
Web Summary : Enjoy homemade raw mango jam with bread or roti. This simple recipe uses minimal ingredients and no preservatives, offering a healthy, delicious alternative to store-bought jams. Kids will love its unique, tangy flavor.
Web Summary : घर पर ब्रेड या रोटी के साथ कच्चे आम का जैम का आनंद लें। यह सरल रेसिपी कम सामग्री और बिना प्रिजर्वेटिव का उपयोग करती है, जो बाजार में मिलने वाले जैम का एक स्वस्थ, स्वादिष्ट विकल्प है। बच्चों को इसका अनूठा, खट्टा स्वाद पसंद आएगा।