Join us
Daily Top 2Weekly Top 5

कैरीचं झणझणीत पिठलं खा, खमंग पारंपरिक पदार्थ इतका आवडेल की मस्त जमेल पिठलंभाताचा बेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 16:27 IST

Summer Special Kairicha Pithala Recipe: सध्या कैरीचे दिवस आहेत तर ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा....(how to make kairicha pithala?)

ठळक मुद्देही रेसिपी अतिशय सोपी असून नेहमीच्या पिठल्यासारखंच हे पिठलंही अतिशय खमंग होतं..

कैरी बाजारात विकायला येऊ लागली की मग आपोआपच उन्हाळा आल्याची जाणीव व्हायला लागते. उन्हाळ्याची रंगत खऱ्या अर्थाने चढत जाते ती कैरीच्या वेगवेगळ्या पदार्थांमुळे... कधी कैरीचं इंस्टंट लोणचं असतं तर कधी तक्कू, छुंदा, मेथांबा असे वेगवेगळे पदार्थ... उन्हातून घरी आल्यावर गारेगार कैरी पन्हं प्यायल्यानंतर तर केवढं समाधान वाटतं. आता याच कैरी स्पेशल पदार्थांमध्ये कैरीचं पिठलं किंवा कैरीचा झुणका हा पदार्थही घेऊन टाका आणि पुढे सांगितलेली रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पाहा. ही रेसिपी अतिशय सोपी असून नेहमीच्या पिठल्यासारखंच हे पिठलंही अतिशय खमंग होतं..(Summer Special Kairicha Pithala Recipe)

कैरीचं झणझणीत पिठलं करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ मध्यम आकाराचा कांदा

१ वाटी बेसन पीठ

शुगर आहे, मग जेवण झाल्या झाल्या करा ‘हे’ १ काम, रक्तातील साखर कायम राहील नियंत्रणात

८ ते १० लसूण पाकळ्या आणि ७ ते ८ हिरव्या मिरच्या

१ मध्यम आकाराची आंबट कैरी

फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, जिरे आणि चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर

रेसिपी

 

सगळ्यात आधी तर लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या. यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढईतलं तेल तापल्यानंतर फोडणी करून घ्या.

यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो चांगला परतून घ्या. कांदा लालसर होत आला की त्यामध्ये लसूण- हिरव्या मिरचीचं वाटण घालून ते देखील परतून घ्या. यानंतर त्यात किसलेली कैरी घाला. 

अधिक मास विशेष : जावयाला धोंडे खाऊ घालण्याची पारंपरिक रीत! पुरणाच्या धोंड्याची खास रेसिपी

तोपर्यंत एका भांड्यात बेसन पीठ घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून ते कालवून घ्या. आता हे कालवून घेतलेलं बेसन कढईमध्ये घाला. त्यात चवीनुसार मीठ घालून सगळं एकदा हलवून घ्या. कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली की गरमागरम कैरीचा झुणका किंवा पिठलं तयार. 


 

English
हिंदी सारांश
Web Title : Tangy Mango Pithla Recipe: A Delicious Summer Treat!

Web Summary : Make flavorful Kairicha Pithla, a traditional Maharashtrian dish, using raw mangoes. This easy recipe combines besan, spices, and sour mango for a unique, delicious experience. Perfect with rice!
टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशलउन्हाळा