Lokmat Sakhi >Food > बाप्पांच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांची करा मऊसूत इडली! नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ - इडल्या होतील पटकन फस्त...

बाप्पांच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांची करा मऊसूत इडली! नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ - इडल्या होतील पटकन फस्त...

Jowar Puff Idlis : Leftover Jowar Puff Idlis Recipe : How To Make Jowar Puff Idlis : उरलेल्या लाह्या वाया न जाता घरातील सगळ्यांना आवडेल अशा स्वादिष्ट इडलीचा नाश्ता तयार होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2025 17:27 IST2025-08-30T07:16:02+5:302025-08-30T17:27:47+5:30

Jowar Puff Idlis : Leftover Jowar Puff Idlis Recipe : How To Make Jowar Puff Idlis : उरलेल्या लाह्या वाया न जाता घरातील सगळ्यांना आवडेल अशा स्वादिष्ट इडलीचा नाश्ता तयार होईल.

Jowar Puff Idlis Leftover Jowar Puff Idlis Recipe How To Make Jowar Puff Idlis | बाप्पांच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांची करा मऊसूत इडली! नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ - इडल्या होतील पटकन फस्त...

बाप्पांच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांची करा मऊसूत इडली! नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ - इडल्या होतील पटकन फस्त...

गणपती बाप्पाच्या आगमनाने घराघरात एक उत्साहाचे वातावरण निर्माण होते. बाप्पांचे घरात आगमन झाल्यावर मग पुढील दहा दिवस बाप्पांसाठी खास  अनेक प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य केला जातो. त्यापैकीच एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लाह्या. गणेशोत्सवात नैवेद्याला दिलेल्या लाह्या म्हणजे बाप्पांच्या प्रसादातील खास पदार्थ. अनेकदा नैवेद्यासाठी आणलेल्या लाह्या जास्त शिल्लक राहतात. अशावेळी, त्या तशाच पडून राहतात आणि त्या फारशा खाल्ल्या देखील( Jowar Puff Idlis) जात नाहीत. लाह्या जास्त प्रमाणात उरतात आणि त्याचा काय उपयोग करावा हा प्रश्न पडतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही! या उरलेल्या लाह्या (Leftover Jowar Puff Idlis Recipe) फेकून देण्याऐवजी, त्याचा उपयोग करून तुम्ही एक हटके आणि रुचकर पदार्थ बनवू शकता. फेकून देण्याऐवजी या उरलेल्या लाह्यांपासून चविष्ट व हेल्दी असा नवा पदार्थ तयार करता येतो(How To Make  Jowar Puff Idlis).

अगदी सोप्या पद्धतीने लाह्यांची इडली करून आपण या उरलेल्या लाह्यांचा वापर करू शकतो. या खास रेसिपीमुळे उरलेल्या लाह्या वाया न जाता घरातील सगळ्यांना आवडेल अशा स्वादिष्ट इडलीचा नाश्ता तयार होईल. गणपती बाप्पाच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांपासून पौष्टिक आणि मऊ इडली कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. झटपट होणारी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर अशी ही पौष्टिक इडली खायलाही तिकीच चविष्ट लागते. कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणारी ही इडली सर्वांना नक्कीच आवडेल. 

साहित्य :- 

१. ज्वारीच्या लाह्या - २ कप (भाजून मिक्सरमध्ये बारीक पूड करावी)
२. बारीक रवा - १ कप
३. दही - १ वाटी 
४. गाजर - १/२ कप (किसलेलं)
५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
६. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या)
७. आल्याची पेस्ट - १/२ टेबलस्पून
८. मीठ - चवीनुसार
९. पाणी - गरजेनुसार
१०. इनो / फ्रुट सॉल्ट - १/२ टेबलस्पून 
११. तेल - १ टेबलस्पून  
१२. मोहरी - १/२ टेबलस्पून 
१३. कडीपत्ता - ४ ते ६ पाने 
१४. हिंग - चिमूटभर 

मस्त गोडधोड चविष्ट रसमलाई मोदक! फक्त वाटीभर पनीर आणि १५ मिनिटांत मोदक तयार - पाहा इन्स्टंट रेसिपी...  


तांदुळात अळ्या, पोरकिडे होऊ नये म्हणून, घाला ही जादूई पोटली, खराब न होता तांदूळ टिकेल वर्षानुवर्षे चांगला...

कृती :- 

१. ज्वारीच्या लाह्या कोरड्या भाजून घ्याव्यात. त्यानंतर या भाजलेल्या लाह्या मिक्सरमध्ये घालूंन त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. 
२. आता ज्वारीच्या लाह्यांची वाटून घेतलेली बारीक पूड एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. 
३. या बाऊलमध्ये बारीक रवा, दही, किसलेलं गाजर, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालाव्यात. 
४. त्यानंतर त्यात आल्याची पेस्ट, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून इडली साठीचे मध्यम कंन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करून घ्यावे. 

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त... 

५. दुसऱ्या भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, कडीपत्ता, हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करावी. ही तयार फोडणी बॅटरमध्ये ओतून मिश्रण एकजीव करून घ्यावे. 
६. सगळ्यात शेवटी या बॅटरमध्ये इनो किंवा फ्रुट सॉल्ट या दोघांपैकी काहीतरी एक घालून बॅटर हलवून एकजीव करून घ्यावे. झाकण ठेवून ५ मिनिटे बॅटर तसेच झाकून ठेवावे. 
७. तयार बॅटर इडली पात्रात घालून इडल्या वाफवून घ्याव्यात. 

ज्वारीच्या लाह्यांच्या इडल्या खाण्यासाठी तयार आहेत. चटणी आणि सांबारसोबत या गरमागरम इडल्या अधिकच चविष्ट लागतात.

Web Title: Jowar Puff Idlis Leftover Jowar Puff Idlis Recipe How To Make Jowar Puff Idlis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.