रोज सकाळी नाश्त्याला काय करावं असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतोच. कारण नाश्ता चांगला झाला की दिवसाची सुरुवातही कशी मस्त होते. पण असा सगळ्यांना आवडणारा खमंग, चवदार नाश्ता करायचा म्हणजे नेमकं करावं तरी काय असं होऊन जातं. कारण घरात प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगळ्या आणि शिवाय वेटलॉस करणारी किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती घरात असतील तर त्यांनाही तो चालायला हवा. म्हणूनच अशावेळी करण्यासाठी ज्वारीच्या पिठाचे डोसे हा एक मस्त पर्याय आहे (Jowar Dosa Recipe). ज्वारीमध्ये फायबर आणि इतर पौष्टिक घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळेच आता झटकन ही रेसिपी पाहा आणि लवकरच ट्राय करा...(how to make dosa from jowar aata?)
ज्वारीच्या पिठाचे डोसे करण्याची रेसिपी
साहित्य
अर्धा कप उडीद डाळ आणि पाव कप हरबरा डाळ
अर्धा टीस्पून मेथी दाणे
पंचविशीतल्या प्रत्येक तरुणीला माहिती हव्या ५ गोष्टी.. नेहमी दिसाल तरुण आणि फिटनेस जबरदस्त
१ कप ज्वारीचं पीठ आणि चवीनुसार मीठ
कृती
ज्वारीचे डोसे करण्यासाठी सगळ्यात आधी उडीद डाळ आणि हरबरा डाळ २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि मेथी दाणे घालून ३ ते ४ तासांसाठी भिजत ठेवा. यानंतर भिजलेल्या डाळी मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.
त्यानंतर एका भांड्यात ज्वारीचं पीठ घ्या आणि पाणी घालून ते पातळ भिजवून घ्या. आता भिजवलेल्या ज्वारीच्या पिठामध्ये डाळींचं वाटण घाला.
गुलाबाच्या रोपाला पानं- फुलं कमी आणि नुसत्या काड्याच? घ्या उपाय- पालवी फुटून फुलंही येतील भरपूर
सगळं व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि नंतर ते ७ ते ८ तासांसाठी झाकून ठेवा. यानंतर मिश्रण चांगलं फर्मेंट झालेलं असेल. त्यात चवीनुसार मीठ घाला.
आता या पिठाचे तुम्ही डोसे, उत्तप्पे करू शकता. किंवा अप्पेही करू शकता. तसेच २ ते ३ दिवस हे पीठ फ्रिजमध्ये चांगलं राहातं. एकदा नक्की करून पाहा.
