Join us  

समोर आलं जपानी लोकांच्या निरोगी दीर्घायुष्याचं सिक्रेट; हे लोक असं काय खातात? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 11:53 AM

Japan Secret : जपानी लोक प्रत्येक प्रकारचे अन्नपदार्थ फर्मेंट करून तयार करण्याचा प्रयत्न करतात. फर्मेंटेड फूड यीस्ट घालून तयार केलं जातं.अशा प्रकारचं अन्न तयार करण्यासाठी रात्रभर अन्नपदार्थ रूम टेंमरेचरवर ठेवले जातात.

ठळक मुद्देअभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार जपानी लोक शारिरीकदृष्या एक्टिव्ह असल्यामुळे  लठ्ठपणाची समस्या कमी दिसून येते.  संपूर्ण जगभरात लोक हळूहळू फर्मेंटेड फूडला पसंती दर्शवत आहेत. यामुळे डायबिटीस, हायपरटेंशनसारख्या समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते.

जपानचे लोक आपलं चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी ओळखले जातात. यामागे त्यांची लाईफस्टाईल, स्वच्छतेची सवय, चांगलं खाणं पिणं यांचा वाटा आहे. जपानी लोक आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करतात ज्यामुळे नैसर्गिकरित्या रोगप्रतिराकशक्ती वाढते. जपानी लोक प्रत्येक प्रकारचे अन्नपदार्थ फर्मेंट करून तयार करण्याचा प्रयत्न करतात. फर्मेंटेड फूड यीस्ट घालून तयार केलं जातं.

अशा प्रकारचं अन्न तयार करण्यासाठी रात्रभर अन्नपदार्थ रूम टेंमरेचरवर ठेवले जातात. फर्मेंटेशन बॅक्टेरिया किंवा फंगस आर्गेनिस कम्पाऊंडला एसिडमध्ये बदलण्यास मदत करतात. हे एसिड नॅच्यूरल प्रिजर्वेटिव्हच्या स्वरूपात काम करते. फर्मेंटेड पदार्थ चवीला काहीसे आंबट असून आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. जपानमध्ये फर्मेंटेड पदार्थांचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे.

कॉफी आणि चॉकलेट्स बीन्सलाही फर्मेंट करून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. याव्यतिरिक्त अन्नाला दळून, दूधाला पाश्चराईज्ड करून ,मास लहान लहान तुकड्यांमध्ये बारीक करून फर्मेंटेड फूड तयार केलं जातं. हे एखाद्या प्रक्रिया केलेल्या अन्नप्रमाणे असून जपानी लोक आवडीनं या पदार्थांचे सेवन करतात. 

कान्सस युनिव्हर्सिटीमधील इतिहासाचे प्राध्यापक  एरिक रथ यांनी डिस्कव्हर मॅनजीनशी बोलताना सांगितले की, ''फर्मेंटेड फूडशिवाय पारंपारीक जेवणाचा विचारही केला जाऊ शकत नाही. त्याला हक्को असं म्हणतात.  नट्टो, कत्सुओबुशी आणि नुकाजुकसारखे प्रसिद्ध पदार्थ आणि अल्कोहल ड्रिंक शेक शुचूसुद्धा फर्मेंटेशन प्रक्रियेपासून तयार केले जाते. फर्मेंटेड फूडची खूप मोठी यादी आहे.'' 

जपानमधील कोजी मोल्डचे एक्सपर्ट शिओरी काजीवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार फर्मेंटेड फूड जपानी लोकांचे आयुष्य आणि आरोग्यही आहे. संपूर्ण जगभरात लोक हळूहळू फर्मेंटेड फूडला पसंती दर्शवत आहेत. यामुळे डायबिटीस, हायपरटेंशनसारख्या समस्यांपासून सुटका मिळवता येऊ शकते.

कारण यात मोठ्या प्रमाणावर एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात. फर्मेंटेड दूध,  फळं, भाज्या, मासं फक्त मेंदूसाठीच नाही तर नर्वस सिस्टिमसाठीही फायद्याचे ठरते. जपानी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार फर्मेंटेशनमुळे  शरीरातील फायबर्स, कॅल्शियम, आयरन आणि पोटॅशियमचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.

शरीरातील इम्यूनिटी वाढण्यास मदत होते. पचनाशी संबंधित आजार दूर होतात.  व्हिटामीन B1 ची कमतरता पूर्ण होते. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार जपानी लोक शारिरीकदृष्या एक्टिव्ह असल्यामुळे  लठ्ठपणाची समस्या कमी दिसून येते. 

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सजपान