Jaifal Benefits : आपल्या स्वयंपाकघरात अनेक मसाले असतात. या वेगवेगळ्या टेस्टी, सुगंधी मसाल्यांचा वापर रोज वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. जे अन्नाची चव वाढवतातच, पण त्यांचे औषधी गुण अनेक समस्यांपासून आराम देण्यासही मदत करतात. अशाच मसाल्यांपैकी एक म्हणजे जायफळ. सामान्यपणे पुरणामध्ये जायफळ घातलं जातं हे जास्तीत जास्त लोकांना माहीत असतं, पण अनेकांना त्याहून पुढे जाऊन याचे फायदे माहीत नसतात. ते आज आपण पाहणार आहोत.
जायफळामध्ये मॅंगनीज, कॉपर, मॅग्नेशियम, आयर्न, झिंक, फॉस्फोरस, फायबर तसेच व्हिटामिन A, C आणि E हे शरीरासाठी आवश्यक पोषक घटकही आढळतात. याशिवाय यात अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही असतात जे पचन, झोप आणि वेदना कमी करतात. आयुर्वेदिक डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे.
१. चांगल्या झोपेसाठी
जर रात्री सतत झोपमोड होत असेल किंवा गाढ झोपच लागत नसेल तर तुम्ही जायफळाचे सेवन करू शकता. एक चिमूट जायफळ पावडर दूधात घालून चांगले उकळा. हे दूध दररोज झोपण्यापूर्वी प्या. काही दिवसांतच झोपेची गुणवत्ता सुधारल्याचे जाणवेल.
२. चेहऱ्यावरील डाग-धब्ब्यांसाठी
जायफळ त्वचेवरील डाग-चट्टे आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. कच्च्या दुधात जायफळ घासून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. अर्ध्या तासाने धुऊन टाका. काही दिवसांतच डार्क स्पॉट्स कमी होतील आणि त्वचा उजळ दिसू लागेल.
३. सांधेदुखीमध्ये फायदेशीर
हिवाळ्यात घरातील वृद्ध लोकांना सांधेदुखीची समस्या खूप त्रास देते. यातून आराम मिळवण्यासाठी जायफळ अतिशय फायदेशीर ठरतं. अशात 10 ग्रॅम लवंग आणि 10 ग्रॅम जायफळ जाडसर बारीक करा. हे मिश्रण 100 ग्रॅम तिळाच्या तेलात चांगले गरम करा. गाळून बाटलीत साठवा. हे तेल सांध्यांवर नियमित लावा. दुखण्यात आराम जाणवू लागेल.
जायफळाचे इतर फायदे
- गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यात जायफळ मदत करतं. सकाळी उपाशीपोटी जायफळ घातलेले दूध पिऊ शकता.
- जायफळातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटामिन्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सर्दी-खोकला आणि ऋतूनुसार होणाऱ्या आजारांपासून संरक्षण मिळतं.
- ताण-तणाव कमी करून मन शांत करण्यास जायफळ उपयुक्त आहे. यासाठी नियमितपणे जायफळाचे दूध पिऊ शकता.
Web Summary : Nutmeg boosts sleep, fades spots, eases joint pain. Rich in nutrients, it aids digestion, immunity, and reduces stress. Use in milk, paste, or oil.
Web Summary : जायफल नींद बढ़ाता है, धब्बे मिटाता है, जोड़ों के दर्द को कम करता है। पोषक तत्वों से भरपूर, यह पाचन, प्रतिरक्षा में सहायता करता है और तनाव कम करता है। दूध, पेस्ट या तेल में प्रयोग करें।