बहुतेक भारतीय घरांमध्ये चपाती रोज खाल्ली जाते. चपाती बनवताना अनेकदा टेन्शन येतं. भाकरी, चपाती किंवा पराठा बनवण्यासाठी रोज सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये पीठ मळलं जातं. (night kneaded dough) पीठ मळल्यानंतर काही वेळाने ते वापरलं जातं. (refrigerated roti dough) अनेकांना सकाळी ऑफिसला जाण्याची घाई असते. त्यामुळे ते अर्ध्यापेक्षा जास्त कामाची पूर्वतयारी आधीच करुन ठेवतात. बरेच लोक पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि एक दोन दिवसाने वापरतात. (fresh vs stored dough)
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात, पीठ मळल्यानंतर काही तासांतच वापरावं, अन्यथा ते खराब होऊ शकतं. (dietitian tips for dough)ज्यामुळे आरोग्याला हानी पोहोचवू शकते. उष्ण वातावरणात ठेवल्यास पीठ लगेच आंबट होण्याची शक्यता जास्त असते. आंबलेलं पीठ खाल्ल्यावर पचनावर परिणाम होऊ शकतो.(dough storage tips) पीठात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पॉलीफेनॉल यांसारखे काही पोषक घटक कमी होतात. रात्री मळून ठेवलेलं पीठ पुन्हा वापरावं का? याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो, जाणून घ्या.
द वीकच्या मते, उरलेले पीठ जास्त काळ उघडे ठेवल्याने किंवा खोलीच्या तापमानावर असल्यास बॅक्टेरिया आणि बुरशी लागण्याची शक्यता अधिक असते. पीठात पाणी,ओलावा आणि स्टार्च असतो. जर पीठ ८ ते १० तासांपेक्षा जास्त काळ बाहेर ठेवल्यास ते लगेच काळे पडते आणि त्यांचा आंबट वास येऊ लागतो. ज्यामुळे पोटदुखी, अन्नविषबाधा आणि उलट्या होण्याची शक्यता असते.
पिठाची शेल्फ लाइफही त्याच्या प्रक्रियेच्या पातळीनुसार बदलते. मैदा हा गव्हाच्या पिठापेक्षा जास्त काळ ताजे राहते. आहारतज्ज्ञ भावेश गुप्ता म्हणतात घरी आपण उरलेले पीठ रात्रभर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हे उरलेले पीठ खाणे खरोखर सुरक्षित आणि आरोग्यदायी आहे का?
अनेकांना असं वाटतं फ्रीजमध्ये पीठ ठेवल्यानंतर ते सुरक्षित राहते. पण हे खरं नाही. हवाबंद डब्यात ८ ते १२ तास पीठ ठेवल्यास ते वापरता येते. पण २४ तासांपेक्षा जास्त काळ पीठ खाण्यायोग्य राहत नाही. रेफ्रिजरेटरचे थंड तापमान बॅक्टेरियाची वाढ कमी करते. म्हणून, १२ तासांनंतर, पीठाची चव, रंग आणि वास बदलू लागतो आणि ते खराब होते. त्याऐवजी आपण ताजे पीठ वापरल्यास आरोग्याला कोणताही धोका होणार नाही.
