Join us

कोंब आलेले बटाटे खाणं सुरक्षित असतं का? वाचा खाल तर काय होईल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 11:03 IST

Sprouted Potato Side Effects : अनेकांना प्रश्न पडतो की, कोंब आलेले बटाटेखावेत की नाही? किंवा कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होईल?  तर याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Sprouted Potato Side Effects :  बटाट्यांचा वापर भारतीय घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बटाटा वडा, बटाटा भजी, बटाट्याची सुकी किंवा रस्स्याची भाजी सगळेच आवडीनं खातात. साधारणपणे दर एक दिवसआड बटाटे खाल्ले जातात. त्यामुळे लोक भरपूर बटाटे घरात स्टोर करून ठेवतात. अशात तुमच्याही कधी ना कधी लक्षात आलं असेल की, घरात बटाटे स्टोर करून ठेवल्यावर त्यांना कोंब येतात. मग अनेकांना प्रश्न पडतो की, कोंब आलेले बटाटे खावेत (Sprouted Potato) की नाही? किंवा कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होईल?  तर याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं काय होतं? 

जेव्हा बटाटे घरात अनेक दिवस ठेवले जातात तेव्हा त्यांना कोंब येतात. जर कोंब येऊ द्यायचे नसतील तर बटाटे मोकळ्या जागेत पसरवून, हवेशीर जागेत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. एक्सपर्ट सांगतात की, कोंब आलेले बटाटे खाल्ल्याने डोळे मोठे होण्याचा धोका असतो.

बटाट्यांना कोंब आल्यावर त्यात ग्लायकोअल्कलॉइड्स नावाचा नॅचरल विषारी पदार्थ तयार होतो. नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या रिपोर्टनुसार, कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये सोलनिन आणि चकोनिन नावाचे दोन ग्लाइकोअल्कलॉइड्स म्हणजे विषारी तत्व आढळतात. तसे हे दोन्ही तत्व सगळ्याच बटाट्यांमध्ये असतात. मात्र, हिरव्या आणि कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये यांचं प्रमाण जास्त असतं.

कोंब आलेले बटाटे खाण्याचे नुकसान

कोंब आलेले बटाटे खाल्ल्यानं तुम्हाला उलटी, जुलाब आणि पोटदुखीची समस्या होऊ शकते. त्याशिवाय असे बटाटे खाल्ल्यानं डोकेदुखीची समस्या देखील वाढते. तसेच शुगरच्या रूग्णांसाठी असे बटाटे खाणं नुकसानकारक ठरू शकतं.

फूड पॉयझनिंगचा धोका

जर तुम्ही नेहमीच कोंब आलेले बटाटे खात असाल तर याचे गंभीर नुकसान होऊ शकतात. कोंब आलेल्या बटाट्यांमधील कार्बोहायड्रेट स्टार्च शुगरमध्ये रूपांतरित होतं. ज्यामुळे तुमच्या शरीरात ब्लड शुगरची लेव्हल वाढते. कोंब आलेल्या बटाट्याने आपलं पचन तंत्रही कमजोर होतं. इतकंच नाही तर याने फूड पॉयझनिंगचाही धोका होतो.

काय कराल उपाय?

- बटाट्यांचा रंग हिरवा दिसत असेल आणि त्यावर कोंब येत असतील तर ते बटाटे वापरू नका.

- बटाटे अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्याची किरणे पोहोचतील. फार थंड जागेवर बटाटे ठेवू नका.

- तसेच बटाटे घरात कांद्यासोबत ठेवू नका. कारण याने गॅस रिलीज होतो आणि बटाट्यांना कोंब येणं सुरू होतं.

- जर तुम्ही जास्त बटाटे आणले असतील तर ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. ज्यामुळे त्यांना हवाही लागेल.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स