Join us

आरोग्यासाठी चांगला असतो का शिळा भात? पाहा काय असतात फायदे आणि याचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 16:49 IST

Leftover rice Benefits and Side Effects : अनेकांना एक प्रश्न पडतो की, हा रात्री उरलेला शिळा भात खाणे सुरक्षित आहे का? तर याचे उत्तर हो आणि नाही, दोन्ही प्रकारे आहे.

Leftover rice Benefits and Side Effects : भारतात जवळपास प्रत्येक घरांमध्ये रोज चपाती, भाजी, वरणासोबत भात बनवला जातो. अनेकांचं तर भाताशिवाय जेवणही होत नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच भात खातात. पण अनेकदा हा भात शिल्लक राहतो. जो दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ला जातो. पण अनेकांना एक प्रश्न पडतो की, हा रात्री उरलेला शिळा भात खाणे सुरक्षित आहे का? तर याचे उत्तर हो आणि नाही, दोन्ही प्रकारे आहे. उरलेला भात फक्त तेव्हा सुरक्षित आणि फायदेशीर असतो, जेव्हा तो योग्य प्रकारे स्टोर केला जातो. जर असं केल नाही तर आरोग्यासंबंधी गंभीर समस्या होऊ शकतात.

उरलेला भात खाणे फायदेशीर आहे का?

पोषक तत्व

जर उरलेला भात नीट स्टोर केला असेल, तर त्यातील कार्बोहायड्रेट, व्हिटामिन बी आणि मिनरल्स जसे पोषक घटक टिकून राहतात. हे शरीराला ऊर्जा देण्याचा चांगला स्रोत असतो.

रेजिस्टंट स्टार्च

शिळा भात खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यातील रेजिस्टंट स्टार्च. ताजा शिजवलेला भात थंड होऊ दिल्यास त्यात एक विशेष प्रकारचा स्टार्च तयार होतो, जो आपल्या शरीरात सहज पचत नाही आणि आंतड्यांमध्ये फायबरसारखे काम करतो. हा स्टार्च आंतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियासाठी अन्नाचे काम करतो, ज्यामुळे पचन तंत्र स्वस्थ राहते.

ब्लड शुगर नियंत्रण

रेजिस्टंट स्टार्च ब्लड शुगर लेव्हस अचानक वाढण्यापासून प्रतिबंध करतो, जे टाइप-2 डायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते.

वजन नियंत्रण

हा शिळा भात खाल्ल्यानं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं, ज्यामुळे ओव्हरईटिंग कमी होते आणि वजन कमी करण्यात मदत मिळते.

उरलेला भात खाण्याचे तोटे

उरलेल्या भातासोबत सर्वात मोठा धोका म्हणजे फूड पॉइझनिंग. हा धोका भात चुकीच्या प्रकारे साठवल्यामुळे होतो.

बॅक्टेरियल इन्फेक्शन

कच्च्या भातात अनेकदा Bacillus cereus नावाचा बॅक्टेरियाचा स्पोर्स असतो. शिजवताना हे स्पोर्स नष्ट होत नाहीत. जेव्हा भात शिजल्यानंतर खोलीच्या तापमानावर ठेवल्या जातो, तेव्हा हे बॅक्टेरिया वेगाने वाढतात आणि टॉक्सिन तयार करतात. हे टॉक्सिन पुन्हा गरम करूनही नष्ट होत नाही.

फूड पॉयझनिंग

या बॅक्टेरियामुळे दूषित भात खाल्ल्यास डायरिया, उलटी, पोटदुखी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ही लक्षणे सहसा 1 ते 5 तासांत दिसतात.

पोषक तत्वांची हानी

उरलेला भात वारंवार गरम केल्यास त्यातील काही पाण्यात विरघळणारी व्हिटामिन्स कमी होऊ शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Leftover Rice: Benefits, Risks, and Safe Consumption Guide

Web Summary : Leftover rice offers resistant starch, aiding digestion and blood sugar control. However, improper storage can lead to bacterial growth, causing food poisoning. Store correctly to enjoy the benefits and avoid health risks.
टॅग्स :अन्नहेल्थ टिप्स