Join us

सेलिब्रिटी डाएट ऐकून आपला आहार बदणे योग्य की अयोग्य?... ऐका आयुर्वेद काय सांगतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2025 17:14 IST

Is it right or wrong to change your diet after listening to celebrity diets? : नक्की कोणता आहार आपल्यासाठी योग्य आहे ते जाणून घ्या.

आजकाल आपण कोणते कपडे घालतो? काय दिनचर्या असावी? कोणत्या ठिकाणी फिरायला जावं? या सगळ्या गोष्टी सेलिब्रिटी काय सांगतात, त्यानुसार ठरवतो.(Is it right or wrong to change your diet after listening to celebrity diets?) त्यांचं सोशल मिडियावर दिसणारं आयुष्य आपल्याला फारच आकर्षक वाटतं. त्यांचा फिटनेस, तशी त्वचा आपल्याला हवी हवीशी वाटायला लागते. ते ज्या प्रकारे गोष्टी रंगवून सांगतात त्यामुळे आपण भारावतो. मग त्यांनी सांगितलेले प्रॉडक्ट वापरतो. कपडे वापरतो. (Is it right or wrong to change your diet after listening to celebrity diets?)आजकाल सेलिब्रिटी डाएट भरपूर चर्चेत असते. ब्लॅक वॉटर, पाश्चात्य जेवणाचे प्रकार खाताना सगळे दिसतात. त्यांच्या व्हिडिओमध्ये विविध इफेक्ट आणि खातानाचे फोटो पाहून आपल्याला ते खावेसे वाटायला लागते. पण प्रत्येक गोष्टीत सेलिब्रिटींनी दिलेले सल्ले ऐकण्याची गरज आहे का?

एकझॉटिक् भाज्या आजकाल फार विकल्या जातात. भारतात त्याला खूप मागणी आहे. आपण रोज जेवतो ते पौष्टिक नाही असं सांगणारे व्हिडिओ बघायला मिळतात. मोठमोठ्या अभिनेत्री भात खाऊ नका सांगतात. दुग्धजन्य पदार्थ सोडायला सांगतात. एवढंच नाही तर भाज्याही खाऊ नका सांगतात. कोबी ऐवजी लेक्टस वापरायला सांगतात. मक्याऐवजी बेबीकॉर्न खायला सांगतात. त्यापुढे असं केल्याने त्यांच्यासारखे दिसाल, असा दावा करतात. मग आपणही त्यांचं म्हणणं ऐकतो.

प्रत्येक देशाचा आहार त्या देशातील वातावरणानुसार असतो. भारतातील हवामानाला साजेसा आहार म्हणजे जो आपण रोज खातो. बदल म्हणून पाश्चात्य अन्न खाण्यात काहीच तोटा नाही. सेलिब्रिटी वापरतात त्या गोष्टी प्रचंड महाग असतात. आपल्याला परवडत नाहीत तरी आपण वापरतो. खरंतर त्याची काहीच गरज नाही.

अनेक डाएटिशियन सांगतात की, पडद्यावर दिसणारे नायिकेचे रूप खरे नाही. अनेक लाइट इफेक्ट्स, मेकअप, टचअप नंतर ते तेवढे सुंदर दिसतात. आयुर्वेदात सांगितलेल्या पौष्टिक आहारात दूध, भाज्या, फळे सगळ्याला महत्त्व आहे. त्यामुळे आवड म्हणून असे पाश्चात्य पदार्थ खाण्यात काहीच हरकत नाही. पण कोणा एका अभिनेत्रीने सांगितले दूध पिऊ नका. भेंडी खाऊ नका म्हणून ते पदार्थ सोडायची गरज नाही. पिढ्यानुपिढ्या चालत आलेला आपला भारतीय आहारच आपल्यासाठी योग्य आहे. पौष्टिक नसलेले पदार्थ आहारातून काढणे गरजेचेच. मात्र आहारच पाश्चात्य करण्याची अजिबात गरज नाही.

टॅग्स :अन्नभाज्याआरोग्यसेलिब्रिटी