जेवण तयार करताना आपण सोप्या सोप्या रेसिपी तयार करण्याचा प्रयत्न करते. कधीतरी किचकट पदार्थ तयार करण्यामध्ये मज्जा वाटते. ( Instead of vegetables, make this Kathiawadi Tikhari, just 10 minutes of work)मात्र इतरही कामे असतात. ऑफीस असते. अशावेळी रोज आपण झटपट तयार होणारे पदार्थच तयार करतो. आपण रोज पोळी, भाजी , आमटी, भात असा पौष्टिक आहार घेतो. कधीतरी वेगळं काही चटपटीत तयार करतो.( Instead of vegetables, make this Kathiawadi Tikhari, just 10 minutes of work) हा ही पदार्थ तसाच आहे. एखादा दिवस भाजीऐवजी करून बघा.
रोज काय वेगळी भाजी तयार करणार? हा प्रश्न तर सगळ्याच घरांमध्ये कॉमन आहे. ( Instead of vegetables, make this Kathiawadi Tikhari, just 10 minutes of work)आता भाजीऐवजी काही तरी मस्त चमचमीत तयार करा. काठियावाडी दही तिखारी हा पदार्थ कधी खाल्ला आहे का? नाही? तर मग नक्की खाऊन बघा. मोजून दहा मिनिटात तयार होतो.
साहित्य
दही, मोहरी, तेल, कोथिंबीर, जिरं, कडीपत्ता, कांदा, लसूण, हळद, मीठ, आलं, हिरवी मिरची
कृती
१. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवा. त्यामध्ये मोहरी घाला. मोहरी मस्त तडतडली की त्यामध्ये कडीपत्ता घाला. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
२. आता मस्त बारीक चिरलेला कांदा त्या फोडणीमध्ये घाला. कांदा छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
३. मिक्सरच्या भांड्यामध्ये सोललेली भरपूरशी लसूण घ्या. त्यामध्ये लाल तिखटाची पावडर घाला आणि त्याची पेस्ट करून घ्या. पारंपारिक पद्धतीमध्ये लसूण व लाल तिखट पाट्यावर जाडसर वाटून घेतात. ते जर शक्य असेल तर, त्या पद्धतीने वाटा. नाही तर मिक्सर वापरून चालतोच.
४. तयार पेस्टही कांद्याच्या मिश्रणाबरोबर परतून घ्या. सगळं छान शिजवून घ्या. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
५. सगळं छान परतून झाल्यावर गॅस बंद करा आणि ५ मिनिटांनंतर छान गोड असं दही त्या फोडणीमध्ये टाका. गॅस चालू असताना दही घातले तर ते फाटते.
६. दही व्यवस्थित मिक्स करून घ्या.
भाजीऐवजी हा दही तडका करून बघा. उन्हाळ्याच्या दिवसांसाठी अगदीच परफेक्ट रेसिपी आहे.