Join us  

कपभर रवा अन् दही, करा विकतसारखा मऊसूत- पांढरा ढोकळा; पाहा इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2024 1:38 PM

instant sooji dhokla recipe | suji ka dhokla : कधीच न फसणारा जाळीदार रवा ढोकळा करण्याची सोपी कृती

रोज रोज एकच प्रकारचा नाश्ता खाऊन कंटाळा येतो (Ravyacha Dhokla). नाश्त्याला आपण पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ आवर्जून खातो. हे पदार्थ आरोग्यासाठी उत्तम आणि चवीला देखील भन्नाट लागतात. तर काही लोक रोज पोळी भाजी खातात. पण रोजचे हे पदार्थ खाऊन कधीतरी कंटाळा येतो (Cooking Tips). या व्यतिरिक्त हटके पदार्थ खाण्याची इच्छा होते. जर आपल्याला देखील काहीतरी हटके, पौष्टीक आणि चविष्ट खाण्याची इच्छा होत असेल तर, रवा ढोकळा करून खा (Sooji Dhokla).

घरातील सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून शिवाय, कमी वेळात मऊ लुशलुशीत ढोकळा तयार होतो. विकतसारखा फुलणारा काही मिनिटात तयार होणारा ढोकळा कपभर रव्यात तयार होतो. पण बहुतांश वेळा रवा ढोकळा फसतो. नीट फुलत नाही. जर आपल्याला परफेक्ट फुलणारा रवा ढोकळा खायचा असेल तर, ही रेसिपी नक्की फॉलो करा(instant sooji dhokla recipe | suji ka dhokla).

फ्लफी रवा ढोकळा करण्यासाठी लागणारं साहित्य

रवा

दही

पाणी

हिरवी मिरची

तेल

मीठ

तळल्यावर पुऱ्या तेलकट होतात? पीठ भिजवताना घाला १ पांढरा पदार्थ, पुऱ्या तेलकट होणारच नाहीत

जिरं

मोहरी

कडीपत्ता

पांढरे तीळ

इनो

लाल तिखट

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात एक कप रवा घ्या. त्यात एक कप दही, अर्धा कप पाणी घालून साहित्य मिक्स करा. साहित्य एकजीव केल्यानंतर त्यात एक चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, एक टेबलस्पून तेल घालून व्हिस्करने साहित्य मिक्स करा. नंतर त्यावर २० मिनिटांसाठी झाकण ठेवा. जेणेकरून रवा छान फुलेल.

दुसरीकडे स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर स्टीमरमध्ये स्टॅण्ड ठेवा. आता रव्याच्या मिश्रणात एक कप टेबलस्पून इनो घाला. त्यावर एक चमचा पाणी ओतून मिश्रणात मिक्स करा.

आमरस करणं किचकट काम वाटतं? इन्स्टंट आमरसाची पाहा सोपी कृती; ५ मिनिटात पातेलंभर रस..

आता एका भांड्याला थोडे तेल लावा. त्यात रव्याचं मिश्रण ओतून भांडं स्टीमरमध्ये ठेवा. त्याच्यावर चिमुटभर लाल तिखट भुरभुरा, नंतर स्टीमरचं झाकण लावा. २० मिनिटांसाठी मध्यम आचेवर ढोकळा वाफेवर शिजवून घ्या. ढोकळा वाफेवर  शिजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या.

दुसरीकडे फोडणीच्या पळीत एक चमचा तेल घाला. त्यात जिरं, मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची आणि पांढरे तीळ घालून मिक्स करा. तयार फोडणी ढोकळ्यावर ओतून डिश सर्व्ह करा. आपण हा ढोकळा चटणीसोबत खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स