Noodles Side Effects :आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांना खायलाही वेळ मिळत नाही. काही बनवण्यात वेळ घालवणं तर दूरच राहिलं. याच कारणानं जास्तीत जास्त लोक लवकर तयार होणाऱ्या पदार्थांना प्रायोरिटी देतात. इंस्टंट नूडल्स या लिस्टमध्ये सगळ्यात वर आहे. लहान मुलं असो वा मोठे सगळ्यांना नूडल्सची टेस्ट आवडते. त्याहून महत्वाची बाब म्हणजे नूडल्स तयार करण्यासाठी जास्त वेळही लागत नाही. मात्र, रोज लगेच तयार होणारे खाल्ले तर आरोग्याचं मोठं नुकसान होतं. नेहमीच नूडल्स खाल्ल्यानं शरीर हळूहळू आजारांचं घर बनतं.
इंस्टंट नूडल्समध्ये मैदा, सोडिअम आणि प्रिजर्वेटिव्स भरपूर प्रमाणात असतात, जे आपली पचनक्रिया स्लो करतात. यातील ट्रान्स फॅट आणि सोडिअमचं अधिक सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग आणि लठ्ठपणासारख्या समस्या होतात. तरीही लोक नूडल्सचा आपल्या नियमित आहारात समावेश करतात. कारण ते लवकर तयार होतात. मात्र, ही सवय महागात पडू शकते.
एका रिसर्चनुसार, जे लोक नियमितपणे नूडल्स खातात, त्यांच्या शरीरात पोषणाची कमतरता होते. यात फायबर, व्हिटॅमिन आणि प्रोटीनची कमतरता असते. ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. नेहमीच नूडल्स खाल्ले तर पचनासंबंधी समस्या, वजन वाढणं आणि त्वचेसंबंधी समस्याही होऊ शकतात. जर तुम्हाला हेल्दी लाइफस्टाईल हवी असेल तर नूडल्स कमी प्रमाणात खावेत आणि संतुलित आहाराला महत्व द्यावं.
हाय ब्लड प्रेशर
जर तुम्ही नेहमीच नूडल्स खात असेल तर यामुळे तुमचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. यात सोडिअमचं प्रमाण अधिक असतं, ज्यामुळे तुमचा बीपी हाय होऊ शकतो. नूडल्स जास्त प्रमाणात खाणं हृदयासाठीही घातक असतं. जर तुम्हाला हृदयासंबंधी किंवा ब्लड प्रेशरसंबंधी समस्या टाळायच्या असतील तर लगेच तयार होणारे कमी प्रमाणात खावेत.
वाढतो लठ्ठपणा
२ मिनिटात तयार होणारे नूडल्स हे मैद्यापासून तयार केलेले असता. मैदा आरोग्यासाठी खूप नुकसानकारक असतो. अधिक प्रमाणात नूडल्स खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकतं. यानं तुमचं वजन वेगानं वाढतं. मैद्यात कोणतेही पौष्टिक तत्व नसतात. यात कार्ब्स आणि फॅट असतात. तसेच यात कॅलरी सुद्धा भरपूर असतात. नूडल्स खाल्ल्यानं तुम्हाला लवकर भूक लागते आणि इतर जंक फूड खाण्याचीही इच्छा होते.
पचन तंत्र बिघडतं
इंस्टंट नूडल्समध्ये प्रिजर्वेटिव आणि इतर गोष्टी भरपूर असतात, ज्या आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. त्यामुळे तुम्हाला पचनासंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यानं अपचन आणि गॅसची समस्या होऊ शकते. नूडल्स खाल्ल्यानं पोट फुगू शकतं. त्यामुळे ज्या लोकांना पचनासंबंधी समस्या असतात, त्यांनी नूडल्स खाऊ नये.
मानसिक आरोग्यावर प्रभाव
इंस्टंट नूडल्स नियमितपणे खाल्ल्यास शारीरिक आरोग्य तर बिघडतंच, सोबत मानसिक आरोग्यही बिघडतं. नूडल्स खाऊन डिप्रेशन, एंझायटी इत्यादी मानसिक रोगांचा धोकाही वाढतो. जर तुम्हाला मानसिक आरोग्य चांगलं ठेवायचं अससेल तर पौष्टिक आणि संतुलित आहाराला महत्व दिलं पाहिजे.
हृदयासाठी नुकसानकारक
इंस्टंट नूडल्स खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य बिघडतं. यानं हृदयरोग, स्ट्रोक, डायबिटीसचा धोका वाढतो. कारण यात सोडिअम आणि अनहेल्दी फॅट भरपूर प्रमाणात असतं. जे हृदयाचं नुकसान करतं. जर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर हृदयरोग होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे इंस्टंट नूडल्स खाणं बद करा.