lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

Instant Jowar Idli | Jowar Rava Idli : कपभर ज्वारीच्या पीठाचे तयार करा सॉफ्ट मसाला इडली, १५ मिनिटात इडल्या तयार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2024 11:54 AM2024-02-22T11:54:49+5:302024-02-22T11:57:29+5:30

Instant Jowar Idli | Jowar Rava Idli : कपभर ज्वारीच्या पीठाचे तयार करा सॉफ्ट मसाला इडली, १५ मिनिटात इडल्या तयार..

Instant Jowar Idli | Jowar Rava Idli | ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत मसाला इडली; बनवायला सोपी; पौष्टिक - वजन होईल कमी

साऊथ इंडियन पदार्थ (South Indian Dish) म्हणजे इडली, डोसा. मेदू वडा, अप्पे, उत्तप्पा आवडीने खाल्ले जातात. सोबत सांबार आणि चटणी असली की आपण हे पदार्थ अगदी दाबून खातो. साऊथ इंडियन पदार्थांमध्ये इडली फार फेमस आहे. इडली खाल्ल्याने वजन वाढत नाही, उलट कमी करण्यास मदत मिळते. शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. डाळ-तांदुळाची इडली आपण खाल्लीच असेल (Jowar Idli). पण कधी ज्वारीची इडली खाऊन पहिली आहे का?

ज्वारीमध्ये थायमिन, रिबोफ्लेविन, फोलेट, नियासिन, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक आवश्यक घटक असतात (Cooking Tips). ज्याचा फायदा आरोग्याला होतो. जर आपल्याला डाळ-तांदूळ भिजत न घालता इडली खायची असेल तर, ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत इडली करून खा. आपल्याला ही मसाला इडली नक्कीच आवडेल(Instant Jowar Idli | Jowar Rava Idli).

ज्वारीची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

ज्वारीचे पीठ

रवा

दही

तेल

कोण म्हणतं विरजणाशिवाय दही लावता येत नाही? ३ सुपर ट्रिक्स; घरीच तयार होईल विकतसारखे घट्ट दही

मोहरी

उडीद डाळ

हरभरा डाळ

कडीपत्ता

हिरवी मिरची

चिमुटभर हिंग

किसलेलं आलं

मटार

गाजर

मीठ

बेकिंग सोडा

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप ज्वारीचे पीठ, एक कप रवा, एक कप दही, एक कप पाणी घालून चमच्याने साहित्य एकजीव करा. एका पॅनमध्ये २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा उडीद डाळ, २ चमचे हरभरा डाळ, कडीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिमुटभर हिंग, किसलेलं आलं, मटार, किसलेला गाजर आणि किसलेले खोबरे घालून साहित्य भाजून घ्या. भाजलेले मिश्रण ज्वारीच्या बॅटरमध्ये ओतून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर खायचा सोडा घालून मिक्स करा.

कुकरच्या शिट्टीतून फसफसून पाणी येतं? डाळ शिजतच नाही? ५ गोष्टींकडे कधीच दुर्लक्ष करू नका, कारण..

इडली पात्राला ब्रशने थोडे तेल लावा. स्टीमरच्या भांड्यात पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. इडलीच्या पात्रात चमचाभर बॅटर घालून स्टीमरमध्ये ठेवा, व झाकण लावा. १० ते १५ मिनिटानंतर इडली शिजली आहे की नाही हे चेक करा. इडली तयार झाल्यानंतर चमच्याने काढून एका प्लेटमध्ये ठेवा. अशा प्रकारे ज्वारीची मसाला इडली खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Instant Jowar Idli | Jowar Rava Idli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.