Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त...

ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त...

Instant Jawar Papad : Jwariche Papad Recipe : तडे न जाता वर्षभर टिकणारे आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे खुसखुशीत ज्वारीचे पापड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2026 14:53 IST2026-03-10T14:42:30+5:302026-03-10T14:53:11+5:30

Instant Jawar Papad : Jwariche Papad Recipe : तडे न जाता वर्षभर टिकणारे आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे खुसखुशीत ज्वारीचे पापड...

Instant Jawar Papad Jwariche Papad Recipe | ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त...

ज्वारीच्या पिठाचे पापड - पाहा पारंपरिक उन्हाळी रेसिपी - एकही पापड तुटणार नाही - फुलतील मस्त...

उन्हाळ्याच्या सिझनमध्ये कडक उन्हात गच्चीवर किंवा अंगणात पांढरे शुभ्र पापड वाळत घातलेले दिसले की समजावे, साठवणीच्या पदार्थांचा सीझन सुरू झाला आहे! साठवणीच्या पदार्थांमध्ये पापड, लोणची असे अनेक पदार्थ घरोघरी हमखास केले जातात...या पदार्थांमध्ये पापड म्हणजे घरातील सगळ्यांच्या विशेष आवडीचा पदार्थ यातही पापड जर ज्वारीचा असेल तर मग काही विचारूच नका...ताटात गरम वरण-भात आणि सोबत कुरकुरीत ज्वारीचा पापड असेल तर साध्या जेवणाची चव देखील दुपटीने वाढते. अनेकजण बाजारातून तयार पापड विकत आणतात, पण घरच्या घरी बनवलेले पापड चवीला उत्तम आणि आरोग्यासाठीही अधिक चांगले असतात. विशेष म्हणजे घरगुती ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पापड खूपच कुरकुरीत आणि पौष्टिक असतात( Jwariche Papad Recipe).

पापड करताना अनेकदा ते वाळवताना तडे जातात किंवा साठवताना लवकर खराब होतात. अशा वेळी योग्य प्रमाण, योग्य पद्धत आणि काही खास टिप्स माहित असणे खूप महत्त्वाचे असते. जर योग्य प्रकारे पापड केले, तर ते तडे न जाता कुरकुरीत राहतात आणि वर्षभर सहज टिकू शकतात. अगदी साध्या घरगुती ज्वारीच्या पिठापासून, एकही तडा (Instant Jawar Papad) न जाता वर्षभर टिकणारे आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे खुसखुशीत पापड बनवण्याची पारंपारिक आणि सोपी रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. ज्वारीचं पीठ - १ वाटी 
२. मैदा - १ वाटी 
३. गव्हाचं पीठ - १/२ वाटी 
४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
५. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून 
६. मीठ - चवीनुसार
७. हिंग - १/२ टेबलस्पून 
८. जिरे - १ टेबलस्पून  
९. पाणी - ३ ते ४ कप 

बाहेरचं खाणं तर लांबच, तैमूर साधा केकही खात नाही! आई करीनाची शिस्त, लेकाचं डाएट कडक...


१ लिटर दुधाचं चीज आता घरीही करता येईल, पाहा शुद्ध आणि उत्तम चवीच्या चीजची रेसिपी...

कृती :- 

१. एक जाड पृष्ठभाग असणाऱ्या खोलगट पातेल्यात पाणी ओतून ते व्यवस्थित गरम करून घ्यावं. 
२. गरम पाण्यांत काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ, हिंग, जिरे घालून सगळे मिश्रण कालवून घ्यावं. 
३. पाण्याला उकळी आल्यावर त्यात ज्वारीचं पीठ, मैदा, गव्हाचं पीठ घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून त्याचे कणकेप्रमाणेच घट्ट मिश्रण करून घ्यावे. 
४. पीठ मळून त्याचा गोळा झाल्यावर झाकण ठेवून ४ ते ५ मिनिटे तसेच ठेवून द्यावं. 
५. मग थोडं - थोडं पीठ घेऊन त्यावर पांढरे तीळ आणि थोडं तेल घालून मळून घ्यावं. मळून घेतलेल्या पिठाचे छोटे गोलाकार गोळे करून घ्यावेत. 

अस्सल गावरान चवीची भरली वालपापडी! चपाती,भाकरीसोबत लागेल अप्रतिम - प्रत्येकाला आवडेलच असा पारंपरिक पदार्थ... 

६. प्लास्टिक शीट घेऊन त्यावर एक - एक पिठाचा गोळा ठेवून पापड लाटून घ्यावा किंवा आपण पापड तयार करण्याच्या प्रेस मशीनने देखील पापड तयार करून शकता. 
७. तयार पापड उन्हांत २ ते ३ दिवस व्यवस्थित पूर्ण सुकेपर्यंत वाळवून घ्यावेत. वाळलेले पापड हवाबंद डब्यांत भरून वर्षभरासाठी आपण स्टोअर करून ठेवू शकता. 

भाकरीसाठीच्या घरगुती ज्वारीच्या पिठाचे तडे न जाणारे आणि वर्षभर टिकणारे कुरकुरीत पापड तयार आहेत.

Web Title : ज्वार के आटे के पापड़: कुरकुरे और बिना दरार वाले, पारंपरिक ग्रीष्मकालीन व्यंजन

Web Summary : इस गर्मी में घर पर बनाएं कुरकुरे और बिना दरार वाले ज्वार के आटे के पापड़! इस पारंपरिक रेसिपी में ज्वार, गेहूं और मैदा जैसे साधारण सामग्री का उपयोग होता है, साथ ही मसाले भी डाले जाते हैं। पूरे साल ताज़ा और स्वादिष्ट रहने वाले पापड़ों के लिए इन युक्तियों का पालन करें।

Web Title : Jowar Flour Papad: Traditional Summer Recipe for Crispy, Crack-Free Delights

Web Summary : Make crispy, crack-free jowar flour papads at home this summer! This traditional recipe uses simple ingredients like jowar, wheat, and all-purpose flour, along with spices. Follow these tips for papads that stay fresh and flavorful all year round.