श्रावण महिना आता सरत आला आहे. त्यामुळे आता श्रावणी सोमवारच्या उपवासाची मजाही संपणार.. म्हणूनच आता शेवटच्या श्रावणी सोमवारचा उपवास अधिक चवदार आणि पोटासाठी दमदार होण्यासाठी उपवासाची इडली करून पाहा (Shravani Somvar Special). ही इडली करायला अगदी सोपी आहे (instant idli recipe for shravani somvar fast). शिवाय ती करण्यासाठी खूप काही पुर्वतयारी करण्याची गरजही नाही (how to make upavasachi idli?). कधी कधी मुलांना डब्यात देण्यासाठीही हा पदार्थ अगदी चांगला आहे.(upavasachi idli recipe in Marathi)
उपवासाची इडली करण्याची रेसिपी
साहित्य
दिड कप भगर
अर्धा कप साबुदाणा
वजन वाढू नये म्हणून जे टाळता; तेच खाऊन करिनाने 'झीरो फिगर' मिळवली होती! वाचा खास गोष्ट
१ कप दही
१ टीस्पून बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
कृती
ही रेसिपी करण्यासाठी भगर आणि साबुदाणा हे दोन्ही पदार्थ स्वतंत्रपणे गॅसवर मंद आचेवर भाजून घ्या.
यानंतर भगर आणि साबुदाणा थंड झाल्यानंतर ते मिक्सरमधून फिरवा आणि त्याची बारीक पावडर किंवा पीठ करा.
पिझ्झा करण्याची ‘ही’ सोपी झटपट रेसिपी पाहा, मुलांना हवा ना पिझ्झा द्या पोटभर-पौष्टिक आणि चमचमीत
यानंतर हे पीठ एका भांड्यात काढा. त्यामध्ये फेटलेले दही आणि कोमट पाणी घालून पीठ कालवून घ्या. पीठ खूप पातळ करू नये. आपण नेहमी इडली करण्यासाठी ज्या पद्धतीचे पीठ तयार करतो, तसेच पीठ असावे. पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून ते १० ते १२ मिनिटे झाकून ठेवा.
त्यानंतर त्यामध्ये बेकिंग साेडा घाला आणि पुन्हा एकदा सगळे पीठ व्यवस्थित हलवून त्याच्या आपण नेहमी लावतो तशा इडल्या लावा. पुढच्या ८ ते १० मिनिटांत गरमागरम, मऊसूत आणि छान फुगुन हलक्या झालेल्या इडल्या तयार..