लोणचे, चटणी, छुंदा आदी तोंडी लावायच्या पदार्थांचे बरेच प्रकार आपल्याकडे केले जातात. लोणचं हा घरोघरी फार आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. (Instant garlic pickle lasts for a month, eat it with chapati or rice, the taste is absolutely delicious!!)विकतच्या लोणच्यापेक्षा घरी केलेले कधीही जास्त चविष्ट असते. आंब्याचे मिरचीचे लोणचे आपण करतोच आता एकदा हे लसणाचे लोणचे करुन पाहा. चवीला अगदी मस्त चमचमीत असते.
साहित्यलसूण, मोहरी, तेल, बडीशेप, मेथीचे दाणे, लाल तिखट, मीठ, हळद, जिरे, कांद्याच्या बिया, आमचूर पूड
कृती१. भरपूर लसूण घ्या. लोणचं करायला अगदीच सोपं आहे फक्त लसूण सोलायला जास्त वेळ लागतो. (Instant garlic pickle lasts for a month, eat it with chapati or rice, the taste is absolutely delicious!!)लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या. लसूण धुवायची. एका कोरड्या कॉटनच्या कापडावर वाळवत टाकायच्या. पंख्याखाली लसणाच्या पाकळ्या वाळवून कोरड्या करुन घ्यायच्या.
२. गॅसवर पॅन ठेवा किंवा कढई घ्या. व्यवस्थित तापवा आणि मग त्यात मोहरी घाला. चार ते पाच चमचे मोहरी घ्यायची. तेल तूप पाणी काहीही न लागू देता सुकीच परतायला घ्यायची. त्यात थोडे मेथीचे दाणे घालायचे. जास्त घेऊ नका लोणचे कडू होईल. मेथी मोहरी सोबत बडीशेपही परतून घ्यायची. त्यात थोडे जिरे घालायचे परतून घ्यायचे. सगळे मसाले खमंग परतल्यावर गॅस बंद करायचा आणि गार करत ठेवायचे.
३. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे. त्याची मस्त सरसरीत पूड करुन घ्यायची. पाणी घालायचे नाही. सुका मसाला करायचा.
४. एका कढईत तेल घ्यायचे. तळणीला घेता तेवढे तेल घ्या. तेल तापल्यावर त्यात लसूण घालायचा. पाच ते सात मिनिटे तळून घ्यायचा. लसणाचा रंग अगदी थोडा बदलल्यावर गॅस बंद करा. तेला सकट लसूण तसाच घ्यायचा. तेल गार झाल्यावर त्यात तयार केलेला मसाला घालायचा. मसाला घालून झाल्यावर त्यात मीठ घाला. लाल तिखट घाला. कांद्याच्या बिया घाला. हळद घाला. आमचूर पूड घाला. सगळं छान ढवळून घ्या. तेलात मसाले एकजीव होऊ द्या. लोणचं गार झाल्यावर हवाबंद डब्यात साठवून ठेवा.