Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाजीला चव येण्यासाठी घाला 'हा' चमचाभर मसाला, सुगंध असा की शेजारचेही रेसिपी विचारायला येतील.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2025 13:28 IST

Instant Garam Masala Recipe: नेहमीच्याच भाज्यांना खूप छान चव आणि खमंग सुगंध हवा असेल तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने घरच्याघरी एक खास मसाला घालून पाहा..(how to make garam masala at home?)

ठळक मुद्देहा मसाला भाज्यांमध्ये घाला आणि भाज्यांना येणारी वेगळी चव आणि सुगंध चाखून पाहा. 

बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या घाई-गडबडीमध्ये भाज्या करताना आपण त्यात थोडं लाल तिखट आणि थोडा गरम मसाला घालतो. काही काही भाज्यांना धनेपूड, जिरेपूडही घालतो. पण यामुळे भाज्यांना तीच ती नेहमीची चव असते. ही चव घरातल्या मंडळींना आणि विशेषत: लहान मुलांना कंटाळवाणी होते. त्यामुळेच त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं. असं नेहमीच काहीतरी वेगळं करण्यापेक्षा आपल्या नेहमीच्याच भाज्या थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर त्या भाज्यांना निश्चितच छान चव येते. भाज्यांमध्ये थोडी चवबदल होण्यासाठीच घरच्याघरी एक खास मसाला तयार करा (how to make garam masala at home?). हा मसाला अगदी चमचाभर जरी तुमच्या रोजच्या भाजीत घातला तरी त्या भाजीची चव आणि सुगंध दोन्हीही अप्रतिम होईल..(garam masala recipe for tasty cooking)

नेहमीच्याच भाज्या अधिक चवदार होण्यासाठी खास मसाला

 

साहित्य

२ चमचे धने

जिरे, मिरे आणि बडिशेप प्रत्येकी एकेक चमचा

४ ते ५ तेजपत्ता

नाजुक दंडावर घाला सुंदर बाजुबंद, हातांचं सौंदर्य खुलून दिसाल घरंदाज- बघा बाजुबंदाचे १० लेटेस्ट डिझाईन्स..

२ ते ३ सेमी एवढे दालचिनीचे २ तुकडे

वेलची आणि लवंग प्रत्येकी १० ते १२

२ स्टारफूल आणि ४ ते ५ वाळलेल्या लाल मिरच्या

 

कृती

मसाला तयार करण्यासाठी सगळ्यात आधी वर सांगितलेले मसाल्याचे सगळे पदार्थ एका ताटामध्ये एकत्र करून घ्या.

यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यानंतर मसाल्याचे सगळे पदार्थ एकदमच कढईमध्ये घाला आणि मंद आचेवर सगळे पदार्थ भाजून घ्या.

केस धुण्यासाठी 'या' पद्धतीने जादुई पाणी तयार करा, केस गळणं बंद होऊन वाढतील भराभर

१० ते १२ मिनिटे मंद आचेवर मसाले भाजून झाल्यानंतर ते एका पसरट भांड्यामध्ये काढा. मसाले भाजत असताना ते सतत हलवत राहावे जेणेकरून ते जळत नाही. भाजून घेतलेले मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि अगदी बारीक पावडर करून घ्या. आता हा मसाला भाज्यांमध्ये घाला आणि भाज्यांना येणारी वेगळी चव आणि सुगंध चाखून पाहा. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती