बहुतांश घरांमध्ये वर्षभरासाठी लागणारा गरम मसाला असतोच.. पण तरीही कधी कधी त्याच त्या चवीच्या भाज्या खाण्याचाही कंटाळा येतो. चवीमध्ये काहीतरी बदल हवा असतो. त्यामुळे मग आपण विकत मिळणारे मसाले आणतो आणि त्यांच्या मदतीने भाज्यांना चव आणण्याचा प्रयत्न करतो. पण या मसाल्यांमध्येही केमिकल्स, प्रिझर्व्हेटीव्ह असतात असं म्हटलं जातं. म्हणूनच असे मसाले कधीतरी वापरायला ठिक आहेत. पण रोजच्या रोज मात्र त्यांचा वापर टाळायलाच हवा. त्यासाठी एका खास पद्धतीने इंस्टंट गरम मसाला घरात तयार करून ठेवा (instant garam masala recipe for regular sabji). अगदी एक चमचा जरी हा मसाला भाज्यांमध्ये घातला तरी तुमच्या रोजच्याच भाज्यांना खूप छान चव येईल.(how to make dry masala for sabji at home?)
इंस्टंट गरम मसाला तयार करण्याची रेसिपी
साहित्य
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
चेहऱ्यावर शिंपडा लवंगचं जादुई पाणी, हळूहळू त्वचेचं सौंदर्य खुलून चेहरा दिसेल फ्रेश, ग्लोईंग..
अर्धा चमचा बडिशेप आणि पाव चमचा मेथी दाणे
२ मोठ्या वेलची आणि १ लहान वेलची
१ ते दिड इंच दालचिनीचा तुकडा
साहित्य
घरच्याघरी अगदी सोप्या पद्धतीने इंस्टंट गरम मसाला तयार करण्यासाठी गॅसवर एक कढई किंवा तवा गरम करायला ठेवा.
तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये वरील सगळे पदार्थ घाला आणि मध्यम आचेवर खमंग भाजून घ्या. भाजताना गॅस मोठा करू नये, अन्यथा मसाले जळू शकतात.
गळ्यावरची चरबी वाढल्याने लठ्ठ दिसताय? ५ मिनिटांत ५ व्यायाम करा, मिळेल परफेक्ट जॉ लाईन
नंतर गॅस बंद करा आणि भाजून घेतलेले मसाले पुर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेले मसाले मिक्सरमधून अगदी बारीक फिरवून घ्या. हा मसाला जेवढा बारीक कराल तेवढा त्यातल्या पदार्थांचा स्वाद खुलत जाईल. आता हा तयार केलेला मसाला १५ दिवस तरी अगदी छान टिकतो. नेहमीप्रमाणे भाजीमध्ये लाल तिखट, मसाले घालतो तसा हा घालावा. एकदा चाखून पाहा. घरातल्या सगळ्यांनाही भाज्यांच्या चवीमध्ये झालेला बदल खूप आवडेल.
