Lokmat Sakhi >Food > ना भिजवणे-ना वाटणे, नाश्त्यासाठी करा ज्वारीचा इंस्टंट डोसा! वेटलॉससाठीही परफेक्ट रेसिपी

ना भिजवणे-ना वाटणे, नाश्त्यासाठी करा ज्वारीचा इंस्टंट डोसा! वेटलॉससाठीही परफेक्ट रेसिपी

How To Make Jowar Dosa: वजन, शुगर वाढेल म्हणून तांदूळ असणारा डोसा खाणं टाळत असाल तर आता ज्वारीचा इंस्टंट डोसा करून पाहा.(instant jowar dosa recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2025 17:20 IST2025-08-19T16:58:30+5:302025-08-19T17:20:55+5:30

How To Make Jowar Dosa: वजन, शुगर वाढेल म्हणून तांदूळ असणारा डोसा खाणं टाळत असाल तर आता ज्वारीचा इंस्टंट डोसा करून पाहा.(instant jowar dosa recipe)

instant dosa for weight loss, how to make jowar dosa, instant jowar dosa recipe, jowar dosa for kids tiffin | ना भिजवणे-ना वाटणे, नाश्त्यासाठी करा ज्वारीचा इंस्टंट डोसा! वेटलॉससाठीही परफेक्ट रेसिपी

ना भिजवणे-ना वाटणे, नाश्त्यासाठी करा ज्वारीचा इंस्टंट डोसा! वेटलॉससाठीही परफेक्ट रेसिपी

Highlightsवेटलॉस करणाऱ्यांसाठी आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही तो उत्तम नाश्ता ठरू शकतो.

डोसा हा अनेकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. पण त्यात तांदूळ जास्त प्रमाणात असतात. त्यामुळेच हल्ली वजन आणि शुगर या दोन्ही गोष्टी वाढतील म्हणून अनेक जण तांदूळाचा पारंपरिक डोसा खाणं टाळतात. म्हणूनच आता त्याला हा एक चवदार पर्याय करून पाहा.. ज्वारीच्या पिठाचा इंस्टंट डोसा (instant jowar dosa recipe). हा डोसा करण्यासाठी डाळ, तांदूळ भिजत घालण्याची, ते वाटून घेण्याची आणि नंतर पुन्हा आंबविण्यासाठी ठेवण्याची कटकटच नाही. अगदी जेव्हा इच्छा होईल तेव्हा अवघ्या १५ मिनिटांत डोसा करून खाऊ शकता (how to make jowar dosa?). शिवाय हा डोसा करण्यासाठी आपण ज्वारीचे पीठ वापरत असल्यामुळे वेटलॉस करणाऱ्यांसाठी आणि मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठीही तो उत्तम नाश्ता ठरू शकतो (instant dosa for weight loss). अधूनमधून मुलांना डब्यात देण्यासाठीही ज्वारीचा डाेसा हा एक चांगला पर्याय आहे.(jowar dosa for kids tiffin)

ज्वारीचा इंस्टंट डोसा करण्याची रेसिपी

 

साहित्य

१ वाटी रवा

१ वाटी ज्वारीचे पीठ

अर्धी वाटी दही

कपडे धुतांना एकाचा रंग दुसऱ्याला लागला? २ उपाय- रंगांचे डाग झटपट होतील सहज गायब

चवीनुसार मीठ

अर्धा टीस्पून बेकिंग सोडा

कृती

ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी ज्वारीचे पीठ, रवा आणि दही हे सगळे पदार्थ मिक्सरच्या भांड्यात घाला आणि अगदी बारीक वाटून घ्या.

 

त्यानंतर हे मिश्रण एका मोठ्या भांड्यात काढा. त्यात चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा घाला. सगळे मिश्रण थोडे पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्या आणि त्यानंतर १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा. मिश्रण खूप पातळ किंवा खूप घट्ट करू नये. सरसरीत असावे.

गुरुपुष्यामृत : चांदीच्या दुर्वा, चांदीचा मोदक आणि बरेच काही.. गणरायासाठी घ्या कमी वजनाच्या सुंदर वस्तू

यानंतर नेहमीप्रमाणे तव्याला तेल लावून डोसे करा. अगदी छान डोसे होतील. घरच्या सगळ्यांना खूप आवडतील.

या रेसिपीमध्ये तुम्ही थोडा बदलही करू शकता. कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची, सिमला मिरची, पत्ताकोबी, गाजर अशा भाज्या किसून किंवा अगदी बारीक चिरून तुम्ही बॅटरमध्ये घालू शकता आणि डोसाऐवजी त्याचे चांगले उत्तप्पेही करू शकता. 


 


 

Web Title: instant dosa for weight loss, how to make jowar dosa, instant jowar dosa recipe, jowar dosa for kids tiffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.