'ढोकळा' हा असा पदार्थ आहे की जो सगळ्यांनाच अतिशय आवडतो. ढोकळा चवीला जितका (How To Make Dhokla Spongy And Fluffy At Home) सुंदर लागतो तितकाच तो फुलून आला तर खायला देखील मजा येते. पिवळा धम्मक, मऊ, जाळीदार, लुसलुशीत ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाणे (Instant Dhokla recipe in glass) याहून मोठे सुख नाही. सकाळचा नाश्ता किंवा संध्याकाळची ( Instant Dhokla recipe in glass- No Eno No curd) छोटी भूक भागवण्यासाठी आपण खमण ढोकळा मोठ्या आवडीने खातो. घरच्याघरीच ढोकळा करायचा म्हटलं की खूप मोठा घाट घालावा लागतो(Make Instant Dhokla In A Glass That Too Without Steamer, Here's How).
परंतु जर आपल्याला झटपट कमी साहित्यात अगदी पटकन इन्स्टंट ढोकळा तयार करायचा असेल तर, आपण चक्क पाणी पिण्याच्या ग्लासात मऊ - लुसलुशीत ढोकळा तयार करु शकतो. ढोकळा तयार करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये एकजीव करून ते ग्लासात ओतून मग वाफवायचे आणि खमंग असा ढोकळा घरच्याघरीच तयार...या पद्धतीने ढोकळा केल्यास तो मऊ, हलका फुलका आणि चवदार होतो, ग्लासात झटपट घरच्याघरीच ढोकळा तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. बेसन - २ कप
२. मीठ - चवीनुसार
३. हिंग - चिमूटभर
४. हळद - १/२ टेबलस्पून
५. लिंबूसत्व (सायट्रिक अॅसिड) - १ टेबलस्पून
६. साखर - १ टेबलस्पून
७. आले हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून
८. पाणी - १ +१/२ कप
९. तेल - २ टेबलस्पून
१०. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून
११. मोहरी - १/२ टेबलस्पून
१२. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
१३. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
१४. जिरे - १/२ टेबलस्पून
१५. कडीपत्ता - १० ते १२ पाने
ज्वारीच्या भाकरीला द्या थोडा ट्विस्ट आणि करा झटपट मसाला फुलका रोटी - करायला सोपी चवीला अप्रतिम!
पराठ्याची चवच बदलून टाकतो ‘हा’ खास पराठा मसाला, पराठा असो कोणताही होईल एकदम टेस्टी...
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये बेसन घेऊन ते व्यवस्थित बारीक चाळणीने चाळून घ्यावे. बेसन चाळून घेतल्यावर त्यात चवीनुसार मीठ, हिंग, हळद
लिंबूसत्व (सायट्रिक अॅसिड), साखर, आले हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी. हे सगळे मिश्रण चमच्याने व्यवस्थित कालवून एकजीव करून घ्यावे.
२. आता या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण एकजीव करून व्यवस्थित फेटून घ्यावे. मिश्रण ३ ते ४ वेळा व्यवस्थित फेटून घ्यावे.
३. मिश्रण फेटून झाल्यावर त्यात तेल घाला. तेल मिश्रणात मिसळून मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
४. आता स्टीलचा छोटा पेला किंवा ग्लास घेऊन त्याला आतील बाजूने तेल लावून ग्रीसिंग करून घ्यावे.
नॉनस्टिक तवा नसेल तर, नेहमीच्या तव्याला करा इन्स्टंट पद्धतीने नॉनस्टिक! स्वयंपाक होईल झटपट...
५. आता १० मिनिटानंतर झाकून ठेवलेल्या मिश्रणात बेकिंग सोडा घालूंन व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.
६. बॅटर ग्रीसिंग केलेल्या स्टीलच्या पेल्यात किंवा भांड्यात भरून घ्यावे.
७. एका कढईत तळाशी पाणी ठेवून त्यावर स्टँड ठेवून मग त्यावर हे बॅटर भरलेले पेले किंवा ग्लास ठेवून द्यावेत. वरून झाकणीने झाकून १५ ते २० मिनिटे वाफेवर व्यवस्थित वाफवून घ्यावे.
८. ढोकळा वाफवून झाल्यावर तो पेला किंवा ग्लासमधून काढून त्याचे काप पाडून घ्यावेत. एका फोडणीच्या पात्रात तेल गरम करायला ठेवून त्यात मोहरी, जिरे, कडीपत्ता, तीळ, साखर, हिरव्या मिरच्या आणि पाणी घालून तयार फोडणी ढोकळ्यांवर घाला. तयार आहे गरमागरम ढोकळा.
तयार मऊ लुसलुशीत ढोकळा हिरव्या चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.