खवय्यांसाठी कैरी, आंबा हा उन्हाळ्याचा एक खास आनंद. या दिवसांत कैरीचे वेगवेगळे पदार्थ पानात पाहिले की जेवणाची मजा वाढते. आनंदाने दोन घास जास्तच जातात. त्यामुळे या दिवसांत घरोघरी कैरीचे पदार्थ केलेच जातात. आता प्रत्येक पदार्थ करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. म्हणूनच तर आपल्याकडे खाद्य संस्कृतीत एवढी विभिन्नता दिसून येते. कैरीच्या इंस्टंट लोणच्याचंही तसंच (how to make raw mango pickle?). आता तुम्हीही चवदार इंस्टंट लोणचं करत असणारच पण त्यात थोडा बदल हवा असेल तर पुढे सांगितलेली एक रेसिपी पाहा आणि कैरीचं इंस्टंट लोणचं करा...(instant aam pickle recipe)
कैरीचं इंस्टंट लोणचं करण्याची रेसिपी
साधारण १ मध्यम आकाराची कैरी असेल तर त्यासाठी ३ ते ४ हिरव्या मिरच्या आणि ७ ते ८ लसूण पाकळ्या घ्या. लसूण आणि मिरच्या मिक्सरमधून वाटून घ्या आणि त्याची बारीक पेस्ट करा.
यानंतर कैरी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या. त्यानंतर तिचे बारीक तुकडे करा. गॅसवर कढई गरम करायला ठेवा आणि त्यात मोहरी तसेच बडिशेप घालून भाजून घ्या. यानंतर दोन्ही पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्या.
तोपर्यंत कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद लावून झाकून ठेवा. यानंतर लसूण मिरची पेस्ट तेलामध्ये परतून घ्या. तेल थोडं जास्त घालावं. ही पेस्ट थंड झाल्यानंतर कैरीच्या फोडींमध्ये घालावी. त्याच वेळी मिक्सरमधून बारीक केलेला मसाला, लाल तिखट आणि चिमूटभर साखरही घाला.
नीम फूट थेरपी: वाचा कडुलिंब आणि कारल्याच्या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडविण्याचे गजब फायदे
कैरीचं इंस्टंट लोणचं तयार. हे लोणचं वर ठेवलं तरी ८ दिवस चांगलं टिकतं. शिवाय लसूण आणि मिरचीमुळे खूप जास्त चवदार होतं. एकदा ट्राय करून पाहा.
Web Summary : Enjoy summer with this simple, 10-minute raw mango pickle recipe. Grind garlic and green chilies, then lightly roast mustard seeds and fennel. Mix with mango pieces, salt, turmeric, chili powder and sugar for a tasty treat that lasts for days.
Web Summary : या सोप्या, 10 मिनिटांत होणार्या कैरीच्या लोणच्यासोबत उन्हाळ्याचा आनंद घ्या. लसूण आणि हिरव्या मिरच्या वाटून घ्या, मग मोहरी आणि बडीशेप हलके भाजून घ्या. कैरीचे तुकडे, मीठ, हळद, मिरची पावडर आणि साखर मिसळून चविष्ट लोणचे तयार करा, जे अनेक दिवस टिकते.