Lokmat Sakhi >Food > Maharashtra Monsoon food : पावसाळ्यात करा मस्त गरमागरम कढीगोळे, करायला एकदम सोपे-चवीला उत्तम

Maharashtra Monsoon food : पावसाळ्यात करा मस्त गरमागरम कढीगोळे, करायला एकदम सोपे-चवीला उत्तम

Indian food, easy recipe ,Make delicious hot Kadhigole during monsoon - very easy to make, great in taste : कढी तर करताच आता एकदा असे कढीगोळेही करा. लाजबाब चव. झटपट होतात आणि सोपे आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:47 IST2025-06-29T17:56:25+5:302025-06-30T16:47:56+5:30

Indian food, easy recipe ,Make delicious hot Kadhigole during monsoon - very easy to make, great in taste : कढी तर करताच आता एकदा असे कढीगोळेही करा. लाजबाब चव. झटपट होतात आणि सोपे आहेत.

Indian food, easy recipe ,Make delicious hot Kadhigole during monsoon - very easy to make, great in taste | Maharashtra Monsoon food : पावसाळ्यात करा मस्त गरमागरम कढीगोळे, करायला एकदम सोपे-चवीला उत्तम

Maharashtra Monsoon food : पावसाळ्यात करा मस्त गरमागरम कढीगोळे, करायला एकदम सोपे-चवीला उत्तम

घरी कढी असेल तर मग जेवणाची मज्जा दुप्पट होते. पाण्यासारखी कढी पिणारेही लोक आहेत. अत्यंत साधा पदार्थ आहे मात्र चव आहाहाहा!! कढी तर करताच एकदा कढीगोळेही करुन पाहा.(Indian food, easy recipe ,Make delicious hot Kadhigole during monsoon - very easy to make, great in taste) पावसाळ्यात तर नक्कीच करा. गरमागरम चवीला मस्त लागेल. गोळे करायला अगदी सोपे आहेत. 

साहित्य
कढीसाठी सामग्री 
 ताक, बेसन, हळद, हिंग, मीठ, पाणी, तेल, मोहरी, जिरे, कडीपत्ता

 

गोळ्यांसाठी सामग्री
चणा डाळ, हळद, जिरे, ओवा, मीठ, तिखट, कोथिंबीर, पाणी, हिरवी मिरची, आलं, लसूण

कृती
१. वाटीभर चणाडाळ भिजत घालायची. किमान तीन ते चार तास भिजवायची. चणाडाळ भिजल्यावर त्यातील पाणी काढून टाकायचे. एका मिक्सरच्या भांड्यात चणाडाळ घ्यायची. त्यात लसणाच्या काही पाकळ्या घालायच्या. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. आल्याचा लहानसा तुकडा घालायचा. थोडी कोथिंबीर घालायची. मीठ घालायचे. ओवा घाला, जिरे घाला. चमचाभर हळद घाला आणि छान वाटून घ्या. जाडसर वाटायचे. डाळीची थोडी कचकच राहू द्यायची. त्यामुळे गोळा मस्त लागेल. 

२. कढी जशी नेहमी करता अगदी तशीच करा. ताकात हळद घाला, मीठ घाला, बेसन घाला आणि ढवळून घ्या. त्यात गुठळी होणार नाही याची काळजी घ्या. जास्त बेसन नका घेऊ अगदी चमचाभर घ्यायचे. कढईत तेल घ्यायचे. तेल छान तापल्यावर त्यात मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की मग त्यात भरपूर कडीपत्ता घालायचा. कडीपत्ताही छान फुलेल मग त्यात हिंग घाला आणि ताक घाला. छान ढवळा कढी उकळू द्या. कढी मस्त उकळवायची. 

३. तळणी ठेवा आणि तयार पीठाचे गोळे तळून घ्यायचे. लहान भजी करायची. छान कुरकुरीत तळायची. तळून झाल्यावर गोळे कढीत घालायचे आणि पुन्हा एक उकळी काढायाची. काही जण गॅस बंद केल्यावर त्यात गोळे घालतात. तुम्हाला जसे आवडेल तसे करा. वरतून फोडणी देऊ शकता. कढीत कांदा आणि लसूण घालू शकता. विविध पद्धतीने कढगोळे करता येतील.    

Web Title: Indian food, easy recipe ,Make delicious hot Kadhigole during monsoon - very easy to make, great in taste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.