Join us

या उपम्याला ‘उपमा’च नाही! मिळमिळीत उपमा आवडत नसेल तर हा ‘मसाला उपमा’ खाऊन पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 18:22 IST

If you don't like simple Upma then try this 'spicy upma' delicious breakfast recipe : उपमा आवडतो का ? एकदा ही रेसिपी करुन पाहा. सोपी आणि चमचमीत.

भारतातील लोकप्रिय नाश्त्यांपैकी एक म्हणजे उपमा. विविध नावांनी ओळखला जाणारा हा पदार्थ अनेकांना मुळमुळीत वाटतो. ( If you don't like simple Upma then try this 'spicy upma' delicious breakfast recipe )जर तुम्हालाही उपमा आवडत नसेल तर एकदा ही रेसिपी नक्की करुन पाहा. मसाला उपमा चवीला अगदी मस्त लागतो आणि करायला एकदम सोपा आहे. 

साहित्य तूप, रवा, मटार, काजू, कडीपत्ता, मीठ, टोमॅटो, हळद, लाल तिखट, कोथिंबीर, चणा डाळ, उडदाची डाळ, हिरवी मिरची, मोहरी, गाजर, कोथिंबीर, गाजर 

कृती१. एका कढईत थोडे तूप घ्यायचे. तूप छान गरम करायचे आणि मग त्यात रवा परतायचा. रवा छान खमंग परतायचा. अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही. रवा परतून झाल्यावर भाड्यांत काढून घ्यायचा. त्याच कढईत आणखी थोडे तूप घ्यायचे आणि त्यात चणाडाळ परतायची. तसेच उडदाची डाळही घालायची. थोडे काजू घालायचे आणि मस्त परतायचे. कडीपत्ता घालायचा, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे. सगळे छान परतायचे. त्यात कांदा घालायचा. ( If you don't like simple Upma then try this 'spicy upma' delicious breakfast recipe )बारीक चिरलेला कांदा मस्त खमंग गुलाबी परतून घ्यायचा.  

२.  कांदा परतल्यावर त्यात बारीक चिरलेली टोमॅटो घालायचा. बारीक चिरलेले गाजर घालायचे. तसेच मटारचे दाणे घालायचे. फोडणीत घालण्यापूर्वी मटारचे दाणे शिजवून घेतले तर आणखी छान लागतील. असेच घेतले तरी चालेल. मात्र मग जरा नीट परतून घ्यायचे. सगळ्या भाज्या छान परतायच्या. मग त्यात थोडी हळद घालायची. तसेच लाल तिखट घालायचे. मसाले जरा परतून झाल्यावर त्यात पाणी ओतायचे आणि पाणी उकळू द्यायचे.

३. पाणी छान उकळल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. थोडी कोथिंबीर वरुन घेण्यासाठी ठेवायची. सगळे पदार्थ शिजल्यावर त्यात परतलेला रवा घालायचा. रवा घातल्यावर ढवळून घ्यायचे. उपमा वाफवायचा. पाणी आटून रवा शिजेल आणि उपमा मस्त मऊ होईल. असे झाल्यावर गॅस बंद करायचा. उपमा झाकून वाफेवर ठेवायचा. मग ताटात घ्यायचा. त्यावर कोथिंबीर घालायची. आवडत असेल तर शेव लिंबू असे पदार्थही घेऊ शकता.    

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.