Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > मनात आलं की ५ मिनिटांत खा इडली-डोसा-अप्पे-उत्तपा, एकदाच ‘हे’ पीठ करुन ठेवा-पाहा सोपी रेसिपी

मनात आलं की ५ मिनिटांत खा इडली-डोसा-अप्पे-उत्तपा, एकदाच ‘हे’ पीठ करुन ठेवा-पाहा सोपी रेसिपी

Food And Recipe: इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे असे दाक्षिणात्य पदार्थ खूप आवडत असतील तर पुढे सांगितलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते..(idli dosa premix batter recipe)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 17:16 IST2026-02-09T17:15:16+5:302026-02-09T17:16:10+5:30

Food And Recipe: इडली, डोसा, उत्तप्पा, अप्पे असे दाक्षिणात्य पदार्थ खूप आवडत असतील तर पुढे सांगितलेली ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते..(idli dosa premix batter recipe)

idli dosa premix batter recipe, how to make idli dosa premix, instant idli, instant dosa recipe  | मनात आलं की ५ मिनिटांत खा इडली-डोसा-अप्पे-उत्तपा, एकदाच ‘हे’ पीठ करुन ठेवा-पाहा सोपी रेसिपी

मनात आलं की ५ मिनिटांत खा इडली-डोसा-अप्पे-उत्तपा, एकदाच ‘हे’ पीठ करुन ठेवा-पाहा सोपी रेसिपी

इडली, डोसा, उत्तप्पा हे दाक्षिणात्य पदार्थ बहुसंख्य घरांमध्ये अतिशय आवडीने खाल्ले जातात. हे पदार्थ पौष्टिक असतात आणि पचायलाही हलके असतात. त्यामुळेच तर मुलांनाही हे पदार्थ आठवड्यातून एक- दोनदा द्यायला हरकत नाही. शिवाय सकाळच्या गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हे पदार्थ झटपट करून देता येतात. पण त्यात अडचण एकाच गोष्टीची वाटते आणि ती म्हणजे हे पदार्थ तयार करण्यासाठी सगळ्यात आधी त्याला लागणारं पीठ बनवणे. हे काम तुम्हाला अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर पुढे सांगितलेली रेसिपी पाहा आणि प्रिमिक्स पीठ तयार करून ठेवा (idli dosa premix batter recipe). हे पीठ फक्त आंबवून घेतलं की तुम्ही हवे तेव्हा डोसे, इडली, उत्तप्पे करून खाऊ शकता.(how to make idli dosa premix?)

 

इडली, डोसा प्रिमिक्स पीठ

हे पीठ तयार करण्यासाठी ७ वाट्या तांदूळ घ्या. तसेच ३ वाट्या उडीद डाळ घ्या. डाळ आणि तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यातलं पाणी निथळून घ्या आणि मग ते एका सुती कपड्यावर पसरवून टाका आणि पंख्याच्या हवेमध्ये व्यवस्थित वाळू द्या.

डाळ आणि तांदूळ पुर्णपणे कोरडे झाले की आधी तांदूळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. तांदळाचं अगदी पीठ करू नये. ते थोडे रवाळ ठेवावे. यानंतर डाळीमध्ये १ चमचा मेथ्या आणि ३ वाट्या पोहे घालावे. यानंतर हे तिन्ही पदार्थ मिक्सरमधून अगदी बारीक पिठाळ करून घ्यावेत.

 

आता डाळ आणि तांदळाचे पीठ एकत्र करा. तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा हे पीठ घ्या आणि त्यात कोमट पाणी घालून कालवा. इडली, डोशाचं पीठ जसं असतं, साधारण तेवढंच पाणी घालावं. यानंतर हे पीठ ८ ते ९ तास झाकून ठेवावं. त्यानंतर ते चांगलं फर्मेंट झालेलं असेल. आता या पिठाचे तुम्ही डोसे, इडल्या, उत्तप्पा किंवा अप्पे करूनही खाऊ शकता.ही रेसिपी foodyogawithsandhya या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.


 
 

Web Title : इस प्रीमिक्स से 5 मिनट में बनाएं इडली, डोसा बैटर

Web Summary : घर पर बने प्रीमिक्स से इडली और डोसा जैसे दक्षिण भारतीय व्यंजन जल्दी बनाए जा सकते हैं। इस रेसिपी में चावल, उड़द दाल और पोहा का उपयोग किया गया है। सामग्री को पीसकर पानी में मिलाएं, 8-9 घंटे के लिए किण्वन करें और इडली, डोसा या उत्तपम का आनंद लें।

Web Title : Make idli, dosa batter in 5 minutes with this premix.

Web Summary : South Indian dishes like idli and dosa can be prepared quickly with a homemade premix. This recipe uses rice, urad dal, and poha. Grind the ingredients, mix with water, ferment for 8-9 hours, and enjoy idli, dosa, or uttapam.