Join us
Daily Top 2Weekly Top 5

महागडा आंबा विकत घेताना तपासा ५ गोष्टी, कळेल गोड आहे की आंबट- निवडा रसाळ उत्तम फळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 18:36 IST

How To Tell If a Mango Is Ripe without Cutting It : अनेकदा आंबे विकत घेताना आपण भरपूर पैसे मोजतो पण हवेतसे आंबे मिळत नाहीत.

उन्हाळ्याच्या दिवसांत रसाळ, गोड  आंबे खाण्याची मजाच काही वेगळी असते. सध्या बाजारात ठिकठिकाणी आंबे दिसायला सुरूवात झाली आहे. आंबा खायला आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. बरेच लोक आवडीनं आंबे खातात आणि या २ महिन्यात आंब्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात केली जाते. (How To Identify Sweet  Mango Before Buying)

पण अनेकदा आंबे विकत घेताना आपण भरपूर पैसे मोजतो पण हवेतसे आंबे मिळत नाहीत, फसवणूक होते तर कधी देवगड हापूस असं सांगून भलताच आंबा ग्राहकांना विकला जातो. आंबे विकत घेताना गोड आहेत की नाही हे ओळखणं एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त २ ते ३ मिनिटं लागतील. (How To Tell If a Mango Is Ripe without Cutting It)

आंबा गोड आहे की नाही ते कसं ओळखाल? (How To Identify Sweet Mango?)

1) आंब्याचा वास घेऊन पाहा

आंबा गोड आहे की आंबट ते ओळखण्यासाठी देठाजवळ वास घेऊ पाहा. जर अननसप्रमा गोड वास येत असेल तर तो आंबा गोड आहे. जर तिखट किंवा केमिकल्सचा वास येत अेल तर तो आंबा जास्त पिकलेला किंवा खराब असू शकतो.

 2) हलकासा दाबून पाहा

 आंब्याची चव ओळखण्यासाठी आंबा हलक्या हातानं दाबून पाहा. जर थोडा दाबला जात असेल तर तो आंबा पूर्णपणे पिकला आहे. कच्चा आंबा सहज दाबला जात नाही. तसंच अति मऊ असलेला आंबा खराब असतो.

 3) वजन तपासून पाहा

 जर आंबा खूपच वजनदार वाटत असेल तर तो गोड असू शकतो. पिकलेला आंबा आकारानं आणि वजनानं जड वाटू शकतो. कारण यात जास्त रस असतो.

 4) रंगावर जाऊ नका

 जर आंबा  हिरवा दिसत असेल तर तो पिकलेला नाही असं समजू नका.रंग पाहून आंबा विकत घेऊ नका. आंब्यांचे काही प्रकार पिकल्यानंतरही  हिरवेच दिसतात.

 5) देठ पाहून ठरवा

 गोड आणि पूर्णपणे पिकलेला आंबा देठ पाहून ओळखता येतो. गोड आणि पिकलेला आंबा तो असतो त्याच्या देठाचा भाग आत गेलेला असतो. देठाचा भाग वर असेल तर तो आंबा मऊ असू शकतो.

टॅग्स :अन्नआंबाकिचन टिप्स