lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > पिकलेले आंबे लवकर खराब होण्याची भीती वाटते? ३ उपाय, आंबे सडणार नाहीत..

पिकलेले आंबे लवकर खराब होण्याची भीती वाटते? ३ उपाय, आंबे सडणार नाहीत..

How To Store Ripe Mango For Long?: असं बऱ्याचदा होतं की घेतलेले सगळेच आंबे एकदम पिकून जातात. असं झालं तर काय उपाय करायचे पाहा.... (how to keep mango fresh for long )

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2024 01:47 PM2024-05-06T13:47:56+5:302024-05-06T15:44:30+5:30

How To Store Ripe Mango For Long?: असं बऱ्याचदा होतं की घेतलेले सगळेच आंबे एकदम पिकून जातात. असं झालं तर काय उपाय करायचे पाहा.... (how to keep mango fresh for long )

how to store ripe mango for long? 3 remedies to store mango for long shelf life, how to keep mango fresh for long | पिकलेले आंबे लवकर खराब होण्याची भीती वाटते? ३ उपाय, आंबे सडणार नाहीत..

पिकलेले आंबे लवकर खराब होण्याची भीती वाटते? ३ उपाय, आंबे सडणार नाहीत..

Highlightsएकदमच सगळे आंबे पिकले तर चांगलीच पंचाईत होते. कारण ते आंबे काही लगेचच संपत नाहीत आणि मग ते साठवून कसे ठेवायचे हा प्रश्न पडतो.

सध्या आंब्यांचा मौसम आहे.. फळांचा हा राजा बाजारात आला की तो घेण्याचा मोह आवरत नाही. आता सुरुवातीच्या काळात बहुतांश लोकांचा भर हापूस आंब्याची पेटी खरेदी करण्यावर असतो. आंब्याची पेटी घेतल्यावर बऱ्याचदा असं होतं की त्या पेटीतले आंबे एकतर सगळेच पिकलेले असतात किंवा सगळेच कच्चे असतात. कच्चे असतील तर ते सगळेच एकदम पिकतात. असे एकदमच सगळे आंबे पिकले तर चांगलीच पंचाईत होते. कारण ते आंबे काही लगेचच संपत नाहीत आणि मग ते साठवून कसे ठेवायचे हा प्रश्न पडतो (how to store ripe mango for long?). तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल तर हे बघा त्यासाठीचे काही साधे- सोपे उपाय... (how to keep mango fresh for long)

पिकलेले आंबे साठवून ठेवण्याचे उपाय

 

१. फ्रिजमध्ये ठेवा

आंबा खरोखरच पुर्णपणे पिकला आहे की नाही, याची एकदा खात्री करा आणि मगच पिकलेले आंबे फ्रिजमध्ये ठेवा.

घरात लाल मुंग्या, झुरळं झाली? ॲल्यूमिनियम फॉईल घेऊन करा १ उपाय, मुंग्या होतील गायब

पण आंबा जर अर्धवट पिकला असेल तर तो मात्र फ्रिजमध्ये ठेवू नये. कारण त्याची पिकण्याची प्रक्रिया अर्धवट झालेली असल्याने तो खराब होण्याची शक्यता जास्त असते. पिकलेले आंबे तुम्ही ४ ते ५ दिवस फ्रिजमध्ये ठेवू शकता.

 

२. एअरटाईट डबे

पिकलेल्या आंब्याच्या छानपैकी फोडी करा. या फोडी एखाद्या एअरटाईट डब्यात भरा आणि डब्याचे झाकण व्यवस्थित लावून तो डबा फ्रिजमध्ये ठेवून द्या. अशा पद्धतीने ठेवलेला आंबाही २ ते ३ दिवस चांगला राहातो.

फक्त १० दिवसांत चेहऱ्यावर येईल जबरदस्त ग्लो, ॲक्ने- पिंपल्सचे डागही जातील- बघा जादुई उपाय

३. अंधारात ठेवा

पुर्वीच्या काळी किंवा आताही ज्यांच्या घरी आमराई आहे, त्यांच्या घरी आंबे पिकविण्यासाठी आंब्याची आढी घातली जाते. यामध्ये आंबे घरातल्या एखाद्या अंधाऱ्या खोलीत साठवून ठेवले जातात. अशा पद्धतीने तुम्ही आंबे अंधाऱ्या जागी साठवून ठेवू शकता. यामुळे ते जास्त दिवस टिकतील. फक्त त्यांना मोकळी हवा मिळाली पाहिजे. ते खूप बांधून, झाकून ठेवू नका. 

 

 

 

Web Title: how to store ripe mango for long? 3 remedies to store mango for long shelf life, how to keep mango fresh for long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.