Join us

पावसाळ्यात कांदे - बटाटे लवकर सडतात, कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे बटाटे टिकतील भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 12:08 IST

How to Store Potatoes and Onions the Right Way पावसाळ्यात कांदा - बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून 3 टिप्स

भारतीय पदार्थांमध्ये कांदा बटाट्याचा वापर होतोच. कांदा - बटाट्याचा वापर केल्याने पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. व कांद्याची फोडणी देताच जेवणाची रंगत वाढते. मोठे कुटुंब असेल तर, बऱ्याचदा पावसाळ्याची तरतूद म्हणून  जास्तीचे कांदे - बटाटे स्वयंपाक घरात साठवून ठेवले जातात. मात्र, कांदे - बटाटे घरातील उबदार ठिकाणी ठेवल्यास ते लगेच खराब होतात. काही दिवसांमध्ये त्यांना मोड येऊ लागतात. काही वेळेस बटाटे मऊ होतात. ज्यामुळे त्यांचा वापर होत नाही. जर आपण देखील या समस्येने त्रस्त असाल तर, या पद्धतीने कांदे - बटाट्यांना साठवून ठेवा. यामुळे कांदे - बटाटे लवकर खराब होणार नाही(How to Store Potatoes and Onions the Right Way).

कांदे - बटाटे उबदार ठिकाणी ठेऊ नका

घरातील वातावरण उबदार असेल तर, कांदे - बटाटे लवकर खराब होतात. त्यामुळे कांदे - बटाटे नेहमी फार उष्णता अथवा फार गारवा नसेल अशा ठिकाणी ठेवा. पावसाळ्यात शक्यतो हवेशीर ठिकाणी कांदे - बटाटे साठवून ठेवा. यामुळे कांदा - बटाट्याला लवकर कोंब फुटणार नाही. किंवा एका कपड्यात कांदे - बटाटे साठवून ठेवा.

गरमागरम कुरकुरीत खमंग मूग भजी आता भर पावसात घरीच करा झटपट, टपरीवरच्या भजींपेक्षा भारी

कांदा व बटाटे वेगवेगळे ठेवा

कांदा - बटाटा साठवून ठेवत असताना दोन्ही गोष्टी वेगवेगळे ठेवा. त्यात इतर फळे ठेऊ नका. किंवा कांदा - बटाटा मिक्स करून ठेऊ नका. कारण फळात असणाऱ्या आर्द्रतेमुळे कांदा - बटाट्यांवर लवकर कोंब फुटते. 

नारळ फोडून फ्रिजमध्ये ठेवण्याच्या 2 सोप्या ट्रिक, नारळ खराब होणार नाही, बुरशीही लागणार नाही

फ्रिजमध्ये कांदे - बटाटे ठेऊ नका

काही लोकं फ्रिजमध्ये कांदे - बटाटे साठवून ठेवतात. फ्रिजमध्ये बटाटे मऊ पडतात, त्यामुळे त्याला कोंब फुटतात. फ्रिजमध्ये ओलावा असल्यामुळे तिथे कांदे - बटाटे लगेच खराब होऊ शकतात. ओलाव्यामुळे ते अकुंरित होतात आणि लवकर खराब होतात. फ्रिजमध्ये अर्धा चिरलेला कांदा किंवा बटाटा मुळीच ठेऊ नका. शक्यतो कांदे - बटाटे बाहेर - हवेशीर ठिकाणी साठवून ठेवा.

टॅग्स :किचन टिप्सअन्नकांदा