Join us

उन्हाळ्यात इडली-डोशाचे पीठ जास्तच आंबते-फसफसते? पीठ आठवडाभर टिकण्यासाठी ‘ही’ पाहा युक्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 19:28 IST

How to Store Over fermented Idli Dosa Batter : Hacks That Will Keep Your Dosa Batter Fresh and Delicious -Even After A Week : उन्हाळयात इडली डोशाचे पीठ जास्त फुलून आले तर, जास्तीचे पीठ कसे स्टोअर करावे याच्या टिप्स..

इडली, डोसा असे पदार्थ हमखास बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केले जातात. नाश्त्यासाठी असे पदार्थ करायचे म्हणजे खूप मोठा घाट घालावा (How to Store Over fermented Idli Dosa Batter) लागतो. डाळ - तांदुळ भिजवून घ्यायची, मग मिक्सरमध्ये वाटून पीठ तयार करायचे मग हे पीठ आंबवण्याची प्रक्रिया करायची, असे सगळे साग्रसंगीत (Hacks That Will Keep Your Dosa Batter Fresh and Delicious -Even After A Week) करावे लागते. शक्यतो उन्हाळयात, पीठ आंबवण्यासाठी ठेवले असता उष्णतेमुळे काहीवेळा गरजेपेक्षा जास्त आंबवले जाऊन आंबट होते किंवा आहे त्याच्या दुप्पट फुलून येते.

आयत्यावेळी, असे जास्तीचे पीठ फुलून आल्यावर इतक्या पिठाचे नेमके करायचे काय असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. एकतर हे जास्तीचे फुलून आलेले पीठ स्टोअर करून ठेवायचे म्हटलं तरी उष्णतेमुळे ते लवकर खराब होते. तसेच, या जास्तीच्या पिठाच्या इडल्या - डोसे करायचे म्हटलं तर एकावेळी नाश्त्याला इतकं कोण खाणार अशी देखील समस्या येते. यासाठीच, उन्हाळयात जर इडली किंवा डोशाचे पीठ अधिक जास्त फुलून आले तर जास्तीचे पीठ कसे स्टोअर करावे, याच्या टिप्स पाहूयात. या साध्यासोप्या टिप्स फॉलो करून आपण हे जास्तीचे पीठ खराब न होऊ देता भरपूर दिवस चांगले राहील असे स्टोअर करून ठेवू शकतो. 

उन्हाळ्यात इडली - डोशाचे पीठ जास्तीचे फुलून आले तर स्टोअर कसे करावे... 

१. पिठाची विभागणी करून स्टोअर करा :- इडली - डोशाचे पीठ जास्तीचे फुलून आले तर पिठाची विभागणी करून वेगवेगळे स्टोअर करा. जितके पीठ लागणार आहे किंवा लगेच वापरायचे आहे ते बाजूला काढून घ्यावे. तसेच जास्तीचे फुलून आलेले पीठ एका वेगळ्या भांड्यात भरून फ्रिजमध्ये स्टोअर करावे. 

लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...

२. मिठाचा वापर करु नका :- जितके पीठ तुम्ही लगेच वापरणार असाल त्यात मीठ, पाणी, सोडा घालून वापरावे. परंतु जे बॅटर तुम्ही लगेच वापरणार नाही किंवा स्टोअर करणार आहात त्यात मीठ किंवा इतर कोणतेच पदार्थ मिक्स करु नका. यामुळे देखील पीठ खराब होऊ शकते. 

३. खायच्या पानाचा वापर करा :- जे जास्तीचे बॅटर आहे ते स्टोअर करताना त्यात नागवेलीचे (विड्याचे - खायचे पानं) पानं वर हलकेच ठेवून मग फ्रिजमध्ये ठेवून स्टोअर करावे. 

उन्हाळ्यात साजूक तूप करण्यासाठी साठवलेली साय खराब होते? ८ टिप्स - तूप होईल शुभ्र - दाणेदार...

४. १ ते २ दिवसांत वापरावे :- जास्तीचे फुलून आलेले पीठ शक्य तितक्या लवकरात लवकर वापरावे, नाहीतर ते खराब होण्याची शक्यता असते. यासाठी हे पीठ १ ते २ दिवसांत वापरावे.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल