घरी तयार केलेलं रवाळ-दाणेदार साजूक तूप खाण्याची मजा काही वेगळीच. गरमागरम वरण-भातावर साजूक तुपाची धार जणू सुखच. तूप हे बाजारात सहज मिळत असलं तरी अनेकांना वाटतं घरच्या घरी तूप काढणं वेळखाऊ आणि किचकट काम.(Homemade ghee from cream) पण रोजच्या दुधावर येणाऱ्या सायीपासून आपण वाटीभर तूप सहज बनवू शकतो. त्यासाठी आपल्याला साय नीट साठवता यायला हवी. त्यामुळे फ्रीजमध्ये साय ठेवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (How to store milk cream in fridge)
लहानपणापासून आपण आई- आजीला फ्रीजमध्ये किंवा एका डब्यात साय साठवताना पाहिलं असेलच. सायीचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जात नाही तर तूप बनवण्यासाठी देखील केला जातो.(Cream storage tips) पण साय किती काळ साठवायला हवे हे अनेकांना माहित नसते.(Milk cream preservation) साय ही ७ ते १० दिवसांसाठी फ्रीजमध्ये साठवता येते. जर यापेक्षा जास्त काळ साठवले तर ती आंबट होते आणि वासही येऊ लागतो. कधीकधी सायीला बुरशी देखील लागते. त्यासाठी तुपाची चव आणि सुगंध हवा असेल तर ७ ते ८ दिवसांत सायीचा वापर करायला हवा.
हिवाळ्यात टोमॅटो सडतात, काळे पडतात? बुरशी लागू नये म्हणून ३ ट्रिक्स, फ्रीजशिवाय राहतील फ्रेश
1. साय कशी साठवावी?
साय साठवण्यासाठी आपल्याला हवाबंद डबा लागेल. त्यात साय साठवून फ्रीजरमध्ये ठेवा. ज्यामुळे ती खराब होणार नाही. जर डब्याचे झाकण नीट नसेल तर फ्रीजमधील इतर पदार्थांच्या वासाचा तुपाच्या चवीवर परिणाम होतो. साय नेहमी फ्रीजमध्ये थंड पाण्यात ठेवा. साय नेहमी फ्रीजरमध्ये ठेवा. वारंवार फ्रीज उघडल्याने वातावरणात बदल होतो, ज्यामुळे साय लवकर खराब होऊ शकते.
2. साय किती काळ साठवू शकता?
ताज्या सायीपासून बनवलेले तूप नेहमीच सुगंधित आणि चविष्ट असते. जर आपल्याला साय जास्त काळ साठवायचे असेल तर फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीजरमध्ये साय ठेवल्यास जास्तीत जास्त २० ते २५ दिवस टिकते. फ्रीजमधून साय काढल्यानंतर किमान तासभर ती बाहेरच्या वातावरणात राहू द्या. साय जास्त काळ साठवली तर तुपाची चव आणि सुगंध बिघडतो. जर आपण रोज साय साठवत असू तर आठवड्याभरात तूप तयार करा.
3. साय खराब झाली आहे कसं ओळखाल?
1. साय साठवल्यानंतर जर त्यावर पिवळा थर तयार होत असेल किंवा घट्ट झाली असेल तर ती खराब झाली आहे असं समजावं.
2. जर सायीला खूप आंबट वास येत असेल तर ती खराब झाली आहे.
3. सायीमधून पाणी येत असेल तर वापरु नका. तूप खराब होते.
4. जास्त काळा फ्रीजरमध्ये साय ठेवल्यास ती खराब होते. ज्यामुळे तूप बनणार नाही.
