Join us

लिंबाचा रस ३- ४ महिने साठवून ठेवण्याचा सोपा उपाय- पाहिजे तेव्हा इंस्टंट लिंबू सरबत तयार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2025 14:51 IST

How To Store Lemon Juice For 3- 4 Months?: उन्हाळ्यात लिंबू सरबत जरा जास्तच लागतं. त्यामुळेच हा उपाय पाहा आणि अगदी उन्हाळाभर छान टिकेल असा लिंबाचा रस आताच करून ठेवा...(tips and tricks to keep lemon juice fresh for long)

ठळक मुद्देसरबताव्यतिरिक्त अन्य रेसिपींसाठीही तुम्ही लिंबाच्या रसाचे आईस क्यूब वापरू शकता. 

उन्हाळ्यात वातावरणातली उष्णता वाढली की मग आपाेआपण जेवण जरा कमी जाते. खूप काही खाण्याची इच्छाच होत नाही. अशावेळी सारखं काहीतरी थंडगार प्यावंसं वाटतं. डिहायड्रेशन होऊ नये म्हणून डॉक्टरही उन्हाळच्या दिवसांत घरगुती थंड पेय पिण्याचा सल्ला देत असतात. आता असं साधं- सोपं घरगुती पेय म्हणजे लिंबू सरबत. लिंबू सरबत उन्हाळ्याच्या दिवसांत खरोखरच एखाद्या एनर्जी ड्रिंकप्रमाणे काम करतं. त्यामुळे घरोघरीच उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबू सरबत पिण्याचं प्रमाण वाढलेलं असतं. पण या दिवसांत लिंबू नेमकी महाग होऊन जातात (how to store lemon juice for 3- 4 months?). म्हणूनच आता सध्या लिंबू थोडे स्वस्त आहेत तर ते भरपूर प्रमाणात घ्या आणि लिंबाचा रस करून ठेवा. हा रस हाताशी असेल तर अगदी झटपट तुम्हाला लिंबू सरबत करता येईल.(tips and tricks to keep lemon juice fresh for long)

 

लिंबाचा रस जास्तीतजास्त दिवस कसा साठवून ठेवावा?

बऱ्याच जणींचा हा अनुभव असतो की लिंबाचा रस काढून ठेवला तर तो काही दिवसांतच थोड कडवट व्हायला लागतो. शिवाय त्या रसापासून केलेल्या सरबताला एक प्रकारचा उग्र वास येतो. म्हणूनच आता हा उपाय पाहून त्यानुसार लिंबाचा रस करून ठेवा.

कमी वयातच गुडघे दुखतात, पाठ- कंबर गळाली? कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ खा, हाडांचं दुखणं पळून जाईल

यामुळे रसाला कडवडपणा, वास येणं असं काहीही होणार नाही, असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. याविषयीचा व्हिडिओ Anuradha Tambolkar या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

वाटीभर मीठ घेऊन कात्रीला लावा धार! बघा सुरी, कात्री धारदार करण्याच्या भन्नाट ट्रिक्स

लिंबाचा रस तयार करण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईमध्ये साधारण अधी वाटी पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये ३ टीस्पून साखर घाला. आता हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ द्या. साखरेचा आपण जो एकतारी पाक करतो, त्यापेक्षा थोडा कमी अशा पद्धतीने पाक तयार झाला की मग गॅस बंद करा. 

 

साखरेचा पाक पुर्णपणे थंड होऊ द्या. पाक थंड झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी लिंबाचा रस घाला आणि सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्या. आता हे मिश्रण आईस क्यूबमध्ये घालून फ्रिजरमध्ये ठेवून द्या. लिंबाच्या रसाचे आईसक्यूब तयार झाले की ते तुम्ही काढून प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रिजरमध्ये ठेवू शकता.

जेवल्यानंतर फक्त ५ मिनिटे चाला- वजन कमी होण्यासाेबतच मिळतील ५ जबरदस्त फायदे

वर दिलेल्या प्रमाणानुसार पाहिजे तेव्हा लिंबाचा रस तुम्ही साठवून ठेवू शकता. सरबत करण्याच्या वेळी तयार केलेले आईसक्यूब ग्लासमध्ये घाला. त्यात साखर, मीठ घालून हलवलं की लिंबू सरबत झालं तयार. सरबताव्यतिरिक्त अन्य रेसिपींसाठीही तुम्ही लिंबाच्या रसाचे आईस क्यूब वापरू शकता. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.समर स्पेशल