Join us  

टरबूज चिरुन फ्रिजमध्ये ठेवावं का, किती तासानंतर खावं? -२ टिप्स, नाहीतर टरबूजाने बिघडायचं पोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 3:50 PM

How Long Is Leftover Watermelon Good For?: टरबूज आणलं की ते नेहमी उरतंच. म्हणूनच बघा ते एकदा चिरल्यानंतर किती वेळात संपवावं आणि फ्रिजमध्ये कसं साठवून ठेवावं.... (how to store leftover watermelon)

ठळक मुद्देबरेच जण टरबूज उरलं की ते एखाद्या भांड्यात काढतात आणि फ्रिजमध्ये तसंच ठेवून देतात. पण यामुळे फ्रिजमधल्या अन्य पदार्थांचा वास टरबूजाला लागतो आणि ते लवकर खराब होतं.

टरबूज हे फळ बहुसंख्य लोकांच्या आवडीचं. त्यात मुंबई आणि इतर थोडा प्रदेश वगळला तर अन्य प्रांतात ते फक्त उन्हाळ्याच्या दिवसांतच खायला मिळतं. त्यामुळे टरबूजप्रेमी ते या दिवसांत हमखास आणतात. पण इतर फळांसारखं टरबूजाचं नसतं. त्याचा आकार भला मोठा असल्याने ते एकदा चिरलं की लगेचच संपलं असं होत नाही (how to store leftover watermelon). ते थोडंफार का असेना पण उरतंच. मग हे उरलेलं टरबूज फ्रिजमध्ये कसं साठवून ठेवावं आणि ते किती दिवसांत संपवावं (How long is leftover watermelon good for?), असा प्रश्न पडतोच. त्यासाठीच बघा ही खास माहिती... (how do you keep watermelon fresh after cutting it?)

 

उरलेलं टरबूज फ्रिजमध्ये ठेवण्याची योग्य पद्धत

बरेच जण टरबूज उरलं की ते एखाद्या भांड्यात काढतात आणि फ्रिजमध्ये तसंच ठेवून देतात. पण यामुळे फ्रिजमधल्या अन्य पदार्थांचा वास टरबूजाला लागतो आणि ते लवकर खराब होतं. 

नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

१. त्यामुळे टरबूज नेहमी मधोमध अर्ध कापावं. समजा अर्धा गोल संपला तर उरलेल्या अर्ध्या टरबूजाचा लालसर- गुलाबी भाग cling film ने झाकून टाकावा. किंवा ते नसेल तर ॲल्यूमिनियम फॉईलने झाकून टाकावा आणि मग ते टरबूज फ्रिजमध्ये ठेवावं. 

उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी ५ खास टिप्स, पोट- कंबरेवर लटकणारी चरबी पटापट उतरेल

२. जर तुम्ही टरबूज पुर्णच कापून त्याच्या बारीक फोडी केल्या असतील आणि त्या फोडी उरल्या असतील तर त्या तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता. किंवा एअरटाईट डबे नसतील तर ॲल्यूमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून एखाद्या पक्क्या झाकणाच्या स्टीलच्या डब्यात ठेवा. 

 

एकदा चिरलेलं टरबूज किती तासांत संपवावं?

एकदा चिरलेलं टरबूज जितक्या लवकर खाता येईल, तितक्या लवकर खाणं चांगलं. कारण हळूहळू त्यातले ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पौष्टिक घटक कमी होत जातात. पण बऱ्याचदा ते लगेचच खाऊन संपवून टाकणं शक्य होत नाही.

ओव्हरथिंकिंगची सवयच लागली? आलिया भटच्या फिटनेस ट्रेनर सांगतात नकारात्मकता कमी करण्याचा उपाय

याविषयी Cutting & Yield Research, NWPB यांनी जो अभ्यास केला आहे, त्यानुसार जर वर सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही चिरलेलं टरबूज साठवून ठेवलं असेल तर ते ४ दिवस चांगलं राहतं. पण एवढे दिवस ते साठवून ठेवण्यापेक्षा लवकरात लवकर संपवलेलं कधीही चांगलं. फार फार तर आज चिरलेलं टरबूज जास्तीतजास्त उद्यापर्यंत संपवून टाकणे कधीही चांगले. 

 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सफळेसमर स्पेशल