Lokmat Sakhi >Beauty > नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

How Many Days Gap Between Two Facial Bleach: टॅनिंग कमी करून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. (side effects of doing facial bleach regularly)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2024 11:40 AM2024-04-25T11:40:16+5:302024-04-25T17:19:29+5:30

How Many Days Gap Between Two Facial Bleach: टॅनिंग कमी करून त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर खूप वाईट परिणाम होऊ शकतात. (side effects of doing facial bleach regularly)

How many days gap between two facial bleach? when to do bleach, side effects of doing facial bleach regularly | नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

नेहमीच ब्लीच करत असाल तर त्वचेवर होतील ५ वाईट परिणाम, म्हणूनच ब्लीच करताना नेहमी.....

Highlightsवारंवार ब्लीच केल्याने त्वचेवर जो परिणाम होतो, त्यामुळे बऱ्याचदा ॲक्ने, ब्रेकआऊट्स, पिंपल्स असा त्रास वाढू शकतो.

क्लिनिंग, ब्लीच, फेशियल यासारख्या ब्यूटी ट्रिटमेंट्स अनेक जणी वारंवार करत असतात. यापैकी क्लिनिंग आणि फेशियल या प्रकारांमध्ये त्वचेवर वेगवेगळे क्रिम लावून मसाज केला जातो आणि त्वचेला स्टिमिंग दिलं जातं. पण ब्लीच या प्रकारात त्वचेवरच्या केसांचा रंग आणि काही अंशी त्वचेचा रंगही बदलण्याचा परिणाम होतो (How many days gap between two facial bleach?). त्यामुळे फेशियल आणि क्लिनिंग या दोन्हींच्या तुलनेत ब्लीच करताना वापरण्यात येणारे क्रिम केमिकली खूप जास्त स्ट्राँग असते. त्याचा त्वचेवर निश्चितच परिणाम होतो. म्हणूनच वारंवार ब्लीच करत असाल तर ते तुमच्या त्वचेसाठी निश्चितच चांगले नाही. (side effects of doing facial bleach regularly)

 

ब्लीच करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

काही जणी अगदी दर महिन्याल फेशियल आणि ब्लीच करतात. असं दर महिन्याला ब्लीच करणं योग्य नाही. त्यामुे साधारणपणे ३ ते ४ महिन्यांनंतर एकदा ब्लीच करावे. आपल्याला माहितीच आहे की ब्लीचमध्ये जे क्रिम वापरतात त्याचा थेट परिणाम त्वचेच्या सगळ्यात बाहेरच्या थरावर होत असतो.

मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

त्यामुळे जर आपण वारंवार ब्लीच केले तर त्वचेचा वरचा थर पातळ होतो आणि तो खूप जास्त सेंसिटिव्ह होतो. त्यामुळे अतिनिल किरण म्हणजे युव्ही रेज यांचा थेट परिणाम त्वचेवर होऊन त्वचेचं नुकसान होऊ शकतं. तसेच वारंवार ब्लीच केल्याने त्वचा नाजूक होते आणि तिची एजिंग प्रोसेस खूप लवकर सुरू होते. 

 

वारंवार ब्लीच केल्याने त्वचेवर जो परिणाम होतो, त्यामुळे बऱ्याचदा ॲक्ने, ब्रेकआऊट्स, पिंपल्स असा त्रास वाढू शकतो. तसेच काही अभ्यासकांच्या मते त्वचेच्या माध्यमातून त्या क्रिमचे काही घटक रक्तात मिसळले जातात.

रुपाली गांगुली म्हणते आज मी यशस्वी अभिनेत्री असले तरी 'या' गोष्टीची कायम खंत वाटते.....

यामुळे हार्मोन्सचे असंतुलन, किडनी- लिव्हर यांच्यावर परिणाम, काही मानसिक आजार असाही परिणाम होऊ शकतो. फेअरनेस क्रिम लावणे किडनीसाठी कसे धोकादायक आहे, याचा अहवाल नुकताच समोर आला आहे. त्याच प्रकारचा त्रास वारंवार ब्लीच केल्यानेही होऊ शकतो. 

 

Web Title: How many days gap between two facial bleach? when to do bleach, side effects of doing facial bleach regularly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.