lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

Democracy Discount For Voters: मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्या रेस्टॉरंटने हा एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यावर अतिशय वेगवेगळ्या कमेंटही येत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2024 05:10 PM2024-04-24T17:10:16+5:302024-04-24T17:12:25+5:30

Democracy Discount For Voters: मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी त्या रेस्टॉरंटने हा एक उपक्रम हाती घेतला आहे. त्यावर अतिशय वेगवेगळ्या कमेंटही येत आहे.

Voters will get 20 percent discount at 'this' restaurant, National Restaurant Association of India's noida chapter declairs special democracy discount for customers on dinner | मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

मतदान करणाऱ्यांना 'या' रेस्टॉरंटमध्ये मिळणार २० टक्के डिस्काउंट, बघा ते रेस्टॉरंट नेमकं कोणतं 

Highlights काही लोक या उपक्रमाचे कौतूक करत आहेत, तर काही लोक याकडे केवळ मार्केटिंग स्टंट आणि व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न म्हणून बघत आहेत.

लोकसभा निवडणूकांची धामधूम सध्या सगळ्या भारतभर पाहायला मिळत आहे. निवडणूकांचा प्रचार, वेगवेगळ्या पक्षातील बड्या नेत्यांचे प्रचार दौरे असं सगळं सध्या उत्साहात सुरू आहे. काही ठिकाणी तर निवडणूकांचा एकेक टप्पाही पार पडला आहे. लोकसभेच्या निवडणूकांमधील मतदानाचा टक्का वाढावा आणि सगळ्यांनीच मतदान करावे, यासाठी सामान्य कार्यकर्त्यांसह नेतेमंडळीही आवाहन करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे सरकारी उपक्रमही राबविण्यात येत आहेत (National Restaurant Association of India's noida chapter). नोएडा येथील एका रेस्टॉरंटनेही त्यासाठीच एक "democracy discounts" हा उपक्रम हाती घेतला आहे.(special democracy discount for customers on dinner by restaurants)

 

National Restaurant Association of India यांच्या नोएडा चाप्टरच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोएडा भागात दि. २६ व  २७ रोजी निवडणूका होत आहेत. त्यामुळे तेथील मतदानाचे प्रमाण वाढावे म्हणून सगळ्या रेस्टॉरंटनी या उपक्रमात सहभागी होण्याचे ठरवले आहे.

कॅल्शियमचा सुपरडोस असणारे ५ चटपटीत पदार्थ, मुलंही आवडीने खातील- हाडं दणकट होतील

यानुसार आता दि. २६ व २७ एप्रिल रोजी जे मतदार मतदान करून रेस्टॉरंटमध्ये डिनर करण्यासाठी येतील, त्यांना त्यांच्या बिलावर २० टक्के डिस्काउंट देण्यात येईल. यासाठी मतदारांनी त्यांच्या हातावरची मतदानाची शाई दाखवणे गरजेचे आहे. शहरातील काही लहान फूड स्टॉल सोडले तर बऱ्यापैकी सगळे रेस्टॉरंट चालक या उपक्रमात सहभागी झाले आहेत.

 

दिल्ली येथे मे महिन्यात लोकसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे त्यावेळी दिल्लीतही हा उपक्रम राबविण्यात येईल. तसेच गुरगाव येथेही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असे National Restaurant Association of India यांच्या दिल्ली आणि गुरगाव चाप्टरतर्फे जाहीर करण्यात आले आहे.

घामामुळे शरीराला दुर्गंधी, केसांतून कुबट वास येतो? ३ पदार्थ खा, उष्णतेचा त्रास होणार नाही 

काही लोक या उपक्रमाचे कौतूक करत आहेत, तर काही लोक याकडे केवळ मार्केटिंग स्टंट आणि व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न म्हणून बघत आहेत. डिस्काउंट जाहीर केल्यामुळे आपोआपच ग्राहकांची संख्या वाढेल. यामुळे रॅस्टॉरंटलाही आर्थिक फायदा होईल, असं काही लाेकांचं म्हणणं आहे. 

 

 

Web Title: Voters will get 20 percent discount at 'this' restaurant, National Restaurant Association of India's noida chapter declairs special democracy discount for customers on dinner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.