Join us

अर्धा चिरलेला लिंबूही राहील जास्त दिवस ताजा! ५ भन्नाट ट्रिक्स - आठवडाभरानंतरही मिळेल भरपूर रस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2025 17:15 IST

how to store half lemon after use : storing half lemon without fridge : keep lemon fresh without refrigeration : tips to preserve cut lemon for long : अर्धा चिरलेला लिंबू फेकून देण्यापेक्षा तो जास्त दिवस कसा चांगला टिकून राहील यासाठी टिप्स...

भारतीय स्वयंपाकात पदार्थांची चव अधिक रुचकर व चविष्ट करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. आपण दररोजच्या भाजी, आमटी किंवा डाळीत लिंबाचा रस घालतो. आपण अनेकदा संपूर्ण एक लिंबू न वापरता, अर्धा चिरलेला लिंबू वापरतो आणि उरलेला तसाच फ्रिजमध्ये ठेवतो. पण काही वेळाने तो सुकतो आणि त्यातील (tips to preserve cut lemon for long) रस निघत नाही. त्यामुळे तो लिंबू फेकून देण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. लिंबू अर्धा कापल्यावर तो जास्त काळ ताजा ठेवणे अवघड (how to store half lemon after use) होते आणि त्याचा रसही सुकतो. सकाळी अर्धा कापलेला लिंबू संध्याकाळपर्यंत वापरला नाही, तर तो वाया जातो असा अनुभव आपण अनेकदा घेतो(keep lemon fresh without refrigeration).

बरेचदा आपण अर्ध्या लिंबाची फोड वापरुन, उरलेला अर्धा लिंबू फ्रिजमध्ये दिवसेंदिवस तसाच ठेवतो. यामुळे तो लिंबू सुकून त्यातील रस पुन्हा काढणे अवघड होते. त्यामुळे अर्धा चिरलेला लिंबू फेकून देण्यापेक्षा तो जास्त दिवस कसा चांगला टिकून राहील यासाठी काही टिप्स पाहूयात. हे उपाय केवळ पैशांची बचतच करणार नाहीत, तर अर्धा चिरलेला लिंबू जास्त काळ ताजा राहील आणि त्यातील संपूर्ण रस सहज काढता येईल. सोपे ५ उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील.

अर्धा चिरलेला लिंबू जास्त दिवस ताजा ठेवण्यासाठी उपाय... 

१. जर तुम्हाला लिंबाच्या रसाचे काही थेंबच वापरायचे असतील, तर पूर्ण लिंबू कापण्याची गरज नाही. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. लिंबू काही सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा किंवा तळहातावर घेऊन हलकेच दाबा. त्यानंतर, टूथपिक किंवा टोकदार वस्तूने लिंबाला एका बाजूला एक लहानसे छिद्र पाडा. आता लिंबू पिळून तुम्हाला जेवढा रस हवा आहे तेवढा काढून घ्या. उरलेला लिंबू फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे लिंबू जास्त काळ ताजा राहील.

उपवासाची काजू कतली! करायला सोपी, जिभेवर रेंगाळणारी चवं - फराळाच्या ताटात हवाच असा पदार्थ... 

बहुतेकांना न आवडणारी भाजी करीना कपूर मात्र खाते आवडीने! म्हणून अजूनही आहे मेंटेन्ड...

२. जर तुम्ही अर्धा कापलेला लिंबू वापरला असेल, तर तो तसाच फ्रिजमध्ये ठेवू नका. त्याऐवजी, अर्धा लिंबू एका लहान एअरटाइट कंटेनरमध्ये ठेवा किंवा प्लास्टिक रॅपमध्ये व्यवस्थित गुंडाळा. तुम्ही तो झिप-लॉक बॅगमध्येही ठेवू शकता. यामुळे लिंबू हवेच्या संपर्कात येणार नाही आणि त्याचा रस सुकणार नाही. अशा प्रकारे, लिंबू २ ते ३ दिवस ताजा राहू शकतो.

३. लिंबाच्या अर्ध्या कापलेल्या भागावर थोडेसे मीठ किंवा साखर लावा. मीठ किंवा साखर यापैकी कोणत्याही एका पदार्थाचा पातळ थर लिंबातील आर्द्रता बाहेर पडण्यापासून थांबवते आणि त्याला सुकू देत नाही. त्यानंतर, तुम्ही तो अर्धा लिंबू एका लहान प्लेटमध्ये उलटा करून फ्रिजमध्ये ठेवू शकता. यामुळे तुमचा अर्धा चिरलेला लिंबू अनेक दिवसांपर्यंत ताजा राहील.

इडली - डोशाचं पीठ जास्त आंबलं,फेकून देण्याआधी वाचा ८ फायदे!  घराच्या स्वच्छतेसाठीही उपयोगी...

४. हा उपाय थोडा वेगळा पण खूपच फायदेशीर ठरू शकतो. एका लहान वाटीत थंड पाणी घ्या आणि त्यात अर्धा कापलेला लिंबू उलटा (चिरलेला भाग पाण्यांत राहील असा) करून ठेवा. पाण्यामुळे लिंबाचा कापलेला भाग ओलसर राहील आणि त्याचा रस सुकणार नाही. आपण पाण्यात किंचित बेकिंग सोडा देखील घालू शकता, ज्यामुळे लिंबू अजून जास्त दिवस ताजा राहण्यास मदत होईल. पण, हे पाणी दररोज बदलावे. 

५. जर आपण अर्ध्या चिरलेल्या लिंबाचा वापर लगेच करणार नसाल, तर लिंबाचा रस फ्रीज करणे हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी लिंबाचा पूर्ण रस काढून तो आइस ट्रेमध्ये ओतून, ट्रे फ्रिझरमध्ये ठेवा. जेव्हा हे क्यूब्स गोठतील, तेव्हा ते बाहेर काढून झिप-लॉक बॅगमध्ये ठेवा आणि फ्रीझरमध्ये साठवा. आता गरज पडेल तेव्हा तुम्ही हे लिंबाचे आइस क्यूब्स कधीही वापरू शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.