Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...

अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...

how to store half coconut without fridge : keep coconut fresh for 10 days naturally : अर्धा उरलेला नारळ १० दिवसांपेक्षा जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2026 17:05 IST2026-03-27T17:00:10+5:302026-03-27T17:05:02+5:30

how to store half coconut without fridge : keep coconut fresh for 10 days naturally : अर्धा उरलेला नारळ १० दिवसांपेक्षा जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठीच्या ट्रिक्स...

how to store half coconut without fridge keep coconut fresh for 10 days naturally | अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...

अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स...

बरेचदा अनेक पदार्थ तयार करताना आपण ओल्या खोबऱ्याचा वापर करतो. ओलं खोबरं म्हणजे अगदी रोजच्याच स्वयंपाकातील बऱ्यापैकी वापरला जाणारा पदार्थ...कधी भाजीचे वाटण असो वा चटणी तर कधी पोहे, भाजी किंवा अशा अनेक पदार्थांवरुन भुरभुरवून घालण्यासाठी ओलं खोबरं घरोघरी हमखास वापरलं जातचं...आपण पूर्ण नारळ फोडतो खरा, पण अनेकदा अर्धाच वापरला जातो आणि उरलेला अर्धा नारळ तसाच पडून राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांत उष्णता आणि आर्द्रतेमुळे हा उरलेला नारळ अगदी एका दिवसातच खराब होतो, त्याला चिकटपणा येतो किंवा बुरशी लागते(how to preserve fresh coconut at home).

घरात फ्रिज असेल तर आपण तो स्टोअर करुन ठेवू शकतो, पण जर (how to store half coconut without fridge) फ्रिज नसेल किंवा लाइट नसेल तर काय? घाबरू नका! अशावेळी आपण काही साध्यासोप्या ट्रिक्स वापरून हा अर्धा नारळ १० दिवसांपेक्षा जास्त दिवस अगदी सहज टिकवू शकता. या टिप्समुळे ( keep coconut fresh for 10 days naturally) खोबऱ्याची चव आणि ताजेपणा दोन्ही कायम राहील.

अर्धा उरलेला नारळ १० दिवसांपेक्षा जास्त दिवस चांगला टिकवून ठेवण्यासाठी... 

१. मीठ लावून ठेवा :- उरलेल्या नारळाच्या पांढऱ्या भागावर हलके मीठ लावून ठेवा. मीठ ओलावा कमी करून बुरशी येण्यापासून संरक्षण करते.

२. मिठाच्या पाण्याचा वापर :- एका खोलगट भांड्यात पाणी घ्या आणि त्यात थोडे मीठ टाका. आता या पाण्यात नारळाची वाटी (खोबऱ्याची बाजू खाली राहील अशा पद्धतीने) बुडवून ठेवा. मीठ नैसर्गिक 'प्रिझर्व्हेटिव्ह' म्हणून काम करते, ज्यामुळे बुरशी लागत नाही. रोज हे पाणी बदलले तर नारळ १० दिवस अगदी ताजा राहतो. शक्यतो झाकण लावू नका. झाकण लावायचेच असेल तर त्या झाकणाला छिद्र आहे का ते तपासा. छिद्रांतून हवा खेळती राहते इतकेच नाही तर आठवड्याला या भांड्यातील पाणी दररोज बदला या ट्रिकमुळे अर्धा शिल्लक राहिलेला नारळ देखील महिनाभर खराब होत नाही. 

कैरीचा मेथांबा म्हणताच तोंडाला सुटेल पाणी, घ्या पारंपरिक रेसिपी-साध्या जेवणालाही येईल आंबटगोड रसरशीत चव...

३. हळदीचा असा वापर करा :- हळद ही अँटी - बॅक्टेरियल असते. उरलेल्या अर्ध्या नारळाच्या पांढऱ्या भागावर थोडी हळद चोळून ठेवा. यामुळे बाहेरील हवेतील जंतूंपासून नारळाचा बचाव होतो आणि तो लवकर खराब होत नाही. वापरण्यापूर्वी फक्त नारळ पाण्याने धुवून घ्या. 

४. व्हाईट व्हिनेगर किंवा लिंबाचा रस :- जर तुम्हाला नारळ जास्त दिवस टिकवायचा असेल, तर एका कापसाच्या बोळ्याने नारळाच्या पांढऱ्या भागावर थोडा व्हाईट व्हिनेगर किंवा लिंबाचा रस लावा. यामुळे नारळाचा रंग बदलत नाही आणि त्याला उग्र वासही येत नाही.

द्राक्षं गोड की आंबट? ताजी गोड द्राक्षं ओळखण्याची पाहा सोपी युक्ती- न खाता निवडा योग्य फळ...

५. वाटीत पाणी भरून ठेवणे :- जर नारळ करवंटीसोबत स्टोअर करुन ठेवायचा असेल, तर त्या करवंटीच्या वाटीत पूर्णपणे पाणी भरून ठेवा आणि ती वाटी थंड जागी ठेवा. दर १२ तासांनी हे पाणी बदला. यामुळे खोबरे कोरडे पडत नाही आणि ताजे राहते.

६. कापडात गुंडाळून ठेवा :- नारळ कोरड्या सूती कापडात गुंडाळून हवेशीर ठिकाणी ठेवा. त्यामुळे ओलावा कमी राहतो.

७. तेलाचा हलका थर लावा :- नारळाच्या पांढऱ्या भागावर बोटाने हलकं तेल लावल्यास तो लवकर सुकत नाही आणि खराबही होत नाही.


Web Title : बचे हुए नारियल को बिना फ्रिज के 10 दिनों तक ताजा रखें!

Web Summary : बचा हुआ नारियल अक्सर जल्दी खराब हो जाता है, खासकर गर्मियों में। नमक, हल्दी या सिरका जैसे सरल उपाय इसे 10 दिनों से अधिक समय तक बिना फ्रिज के संरक्षित कर सकते हैं, जिससे इसका स्वाद और ताजगी बनी रहती है। ये आसान तरीके इसे खराब होने से बचाने में मदद करते हैं।

Web Title : Keep leftover coconut fresh without a fridge for 10 days!

Web Summary : Leftover coconut often spoils quickly, especially in summer. Simple tricks, like using salt, turmeric, or vinegar, can preserve it for over 10 days without refrigeration, maintaining its taste and freshness. These easy methods help prevent spoilage.