Join us
Daily Top 2Weekly Top 5

फ्रिजमध्ये ठेवूनही आलं लवकर वाळतं, बुरशी लागते? पाहा काय केलं तर फ्रिजमध्ये आलं राहतं महिनाभर चांगलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 17:27 IST

How to Store Ginger In Fridge : सामान्यपणे आलं फ्रिजमध्ये स्टोर केलं जातं. पण अनेकांना तक्रारी असतात की, फ्रिजमध्ये ठेवलेलं आलं काही दिवसांमध्येच खराब होतं, वाळतं किंवा त्याचा रंग बदलतो. पण असं का होतं?

How to Store Ginger In Fridge : कडक चहाचा उल्लेख झाला तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोळ्यांसमोर येते ती म्हणजे आलं. चहाची टेस्ट वाढवणं असो एखाद्या भाजीची आलं महत्वाची भूमिका बजावतं. आलं ही अशी गोष्ट आहे जी टेस्टसोबतच पोषक तत्वांचा खजिना आहे. आल्याच्या एक घोट कडक चहा जेव्हा घशाखाली उतरतो, तेव्हा लगेच एनर्जी मिळते. फ्रेश वाटतं. भारतातील प्रत्येक किचनमध्ये भरपूर आलं वापरलं जातं. 

सामान्यपणे आलं फ्रिजमध्ये स्टोर केलं जातं. पण अनेकांना तक्रारी असतात की, फ्रिजमध्ये ठेवलेलं आलं काही दिवसांमध्येच खराब होतं, वाळतं किंवा त्याचा रंग बदलतो. त्यासोबत त्याला बुरशी सुद्धा लागते. पण असं का होतं? तर यामागचं मुख्य कारण म्हणजे आलं चुकीच्या पद्धतीने स्टोर करणं असतं. आलं जर जास्त दिवस फ्रेश ठेवायचं असेल तर नुसतं फ्रिजमध्ये एखाद्या खाण्यात ठेवून भागत नाही. फ्रिजमध्ये आलं स्टोर करण्याच्या काही पद्धती असतात, त्याच जाणून घेऊया.  

आलं धुवून ठेवू नका

जास्तीत जास्त घरांमध्ये हेच बघायला मिळतं की, भाज्या फ्रिजमध्ये ठेवण्याआधी धुतल्या जातात. हेच आल्यासोबतही केलं जातं, पण हेच ते खराब होण्याचं मोठं कारण असतं. आलं ओलं असेल तर त्यात बुरशी लागण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे आलं फ्रिजमध्ये न धुता, न सोलता आणि कोरडंच स्टोर करा. 

पेपर टॉवेल 

आलं स्वत: थोडं पाणी सोडतं. जर हा ओलावा कंटेनरमध्ये आला, तर आलं चिकट किंवा काळं पडून खराब होतं. जर आलं खराब होऊ द्यायचं नसेल तर आलं कोरड्या पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून ठेवा. याने जास्तीचा ओलावा कमी होतो आणि आलं जास्त दिवस फ्रेश राहतं.  

एअर टाईट कंटेनर किंवा झिप लॉक बॅग 

जर आपण आलं फ्रिजमध्ये असंच उघडं ठेवलं तर ते लवकर खराब होतं. हवेत ठेवल्यास ते लवकर वाळतं आणि त्याचा सुगंधही उडतो. त्यामुळे आलं फ्रिजमध्ये एअरटाइट कंटेनर किंवा झिप लॉक बॅगमध्ये ठेवा. याने आलं फ्रेश राहील, सोबतच फ्रिजमधील इतर गोष्टींचा वासही त्याला लागणार नाही. 

फ्रिजमध्ये कुठे स्टोर कराल? 

आलं फ्रिजच्या सामान्य खाण्यात ठेवणं ठाळावं. त्याऐवजी ते क्रिस्पर किंवा व्हेजिटेबल ड्ऱॉअरमध्ये ठेवा. यात तापमान आणि ओलाव्याचं संतुलन योग्य राहतं. असं केल्यास आलं जास्त दिवस फ्रेश राहणार.

English
हिंदी सारांश
Web Title : Keep ginger fresh longer! Store it right in the fridge.

Web Summary : Ginger spoils quickly in the fridge if stored incorrectly. Don't wash it before storing. Wrap in a paper towel, and place in an airtight container in the vegetable drawer for lasting freshness and flavor.
टॅग्स :अन्नकिचन टिप्स