Join us

कोबीचा मोठा गड्डा चिरा भराभरा, ३ सोप्या पद्धती- ५ मिनिटांत चिरा एकसारखा कोबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2023 15:05 IST

How to Shred Cabbage 3 Easy Ways कोबी चिरण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि तो उत्तम चिरला तरच भाजी छान लागते.

कोबीची भाजी काहीजणांना खूप आवडते काहींना अजिबात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोबीच्या भाजीची चव कोबी कशी चिरली यावरही ठरते. छान पातळ, उभी, एकसारखी कोबी चिरली तर भाजी उत्तम लागते. कोबीचे लहान मोठे वेडेवाकडे तुकडे चिरले की भाजीची चवही जाते आणि काहीवेळा भाजी अर्धी कच्चीही राहते.

स्वयंपाक करताना भाज्या चिरणं हे महत्त्वाचंच काम असतं. आणि वाटतं सोपं पण कोबीची भाजी चिरणं हे तसं मोठं कलात्मक काम. एकतर कोबी चिरायलाही वेळ लागतो. त्यामुळेच या तीन टिप्स. कोबीचा गड्डा सरसर,भराभरा कसा चिरायचा?(Tips to Shred Cabbage in 3 Easy Ways)

३ सोप्या पद्धतीने चिरा कोबी

चाकूच्या मदतीने कोबी चिरा

कोबी जर जड आणि कडक असल्यास चाकूच्या मदतीने ती सहज चिरता येईल. यासाठी चाकू मोठा आणि धारदार हवा. सर्वप्रथम, चाकूने कोबीचे २ काप करा. त्यानंतर, दोन्ही भागांचे आणखी २ भाग करा. चारही भाग वेगळे करा. व त्याचे छोटे - छोटे काप करा. या ट्रिकमुळे कोबी झटपट चिरून होईल.

कोबीची नेहमीची भाजी खाऊन कंटाळलात, मग करा झटपट चविष्ट ‘कॅबेज रोल’ - रेसिपी सोपी

चिप्स कटरच्या मदतीने चिरा कोबी

जर आपल्याकडे चिप्स कटर असेल तर, त्याच्या मदतीने कोबी चिरता येईल. यासाठी सर्वप्रथम, चाकूने कोबीचे दोन - लांब भाग करून घ्या. आता एक भाग घ्या, चिप्स कटरवर जसे चिप्स बनवताना बटाटे किसून घेतो, त्याच पद्धतीने दोन्ही भाग किसून घ्या. असे केल्याने कोबी सहज कापली जाईल.

करा कोबीच्या खमंग कुरकुरीत वड्या, कोण म्हणते कोबी बेचव लागते? मस्त झटपट रेसिपी..

कोबी चिरण्यासाठी किसणीची मदत घ्या

आपण किसणीच्या मदतीने अनेक भाज्या चिरून घेतो. यातून आपण कोबी देखील चिरून घेऊ शकता. किसणीला दोन छिद्रे असतात, मोठी किंवा लहान आवडीनुसार कोबी चिरून घ्या. यासाठी किसणी उभी पकडून घ्या, चाकूच्या मदतीने कोबीचे दोन भाग करा, आणि भाजी पटपट किसून घ्या. या पद्धतीचा वापर केल्यास कोबी ५ मिनिटात चिरून होईल.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स